Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : सिंहस्थ मेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ३०६ कोटींचा निधी; मंत्री भुजबळांच्या...

Nashik News : सिंहस्थ मेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ३०६ कोटींचा निधी; मंत्री भुजबळांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक | Nashik

नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ हा धार्मिक सोहळा नाशिकच्या सर्वांगीण विकासाची मोठी संधी आहे, हा दूर दृष्टिकोन ठेवून राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र सरकारच्या ‘भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष अर्थसहाय्य योजने’अंतर्गत ‘नाशिक कुंभमेळा २०२६-२७’साठी मंत्री भुजबळ यांनी सादर केलेल्या प्रकल्पांपैकी ३०६ कोटींच्या प्रकल्पांना केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. ही नाशिक जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. या निर्णयाबद्दल मंत्री भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने (Central Government) राज्यांसाठी ‘भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना २०२४-२५’ सुरू केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तब्बल १५,१७२ कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा आपण प्रशासनाकडून तयार करून घेतला होता. सन २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. सन २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत या प्रकल्पांना मंजुरी मिळविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

अखेर त्याला यश आले असून, मंत्री भुजबळ यांनी सादर केलेल्या नाशिकमधील (Nashik) रिंगरोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, भव्य वाहनतळ, भाविकांसाठी तात्पुरती निवारागृहे (साधुग्राम) आणि मिसिंग लिंक रोड यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प मंजूर झाले असून, सदर प्रकल्पांसाठी केंद्र शासनाचे १०० टक्के अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही. या निधीतून आपले नाशिक जागतिक स्तरावरील आयकॉनिक टुरिस्ट सेंटर बनणार आहे. तसेच या निधीमुळे कुंभमेळ्याचे नियोजन अधिक सुलभ होणार असून, नाशिकच्या पायाभूत सुविधांना शाश्वत दर्जा प्राप्त होणार आहे.

दरम्यान, गोदाघाट परिसरातील (Godaghat Area) ‘राम काल पथ’ उभारणीसाठी ९९.१४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आता प्राप्त झालेल्या ३०६ कोटींच्या निधीमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग मिळणार असून, दळणवळण आणि परिवहन सुविधा अधिक गतिमान होणार आहेत. नाशिकच्या जनतेच्या व असंख्य भाविकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे फलित असून नाशिकला जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आणि विकासाचा हा रथ असाच वेगाने पुढे नेण्यासाठी मी यापुढेही प्रयत्नशील असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात नऊ ठिकाणी केंद्रे; ६१९...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) एका जागेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान (Voting) होणार आहे. या...