Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : मनपाला शिस्त लावण्याचे आयुक्त खत्रींपुढे आव्हान

Nashik News : मनपाला शिस्त लावण्याचे आयुक्त खत्रींपुढे आव्हान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha of Kumbh Mela) योग्य नियोजनासह नाशिक महापालिकेत (Nashik NMC) मागील २५ वर्षांपासून न झालेली नोकर भरती करणे, सतत तोट्यात सापडलेली मनपाची सिटीलिंक बससेवा नफ्यात आणणे, महापालिकेच्या उत्पन्नात होत असलेली घट भरून काढून शहरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नाशिक मनपाच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्यासमोर आहे. २६ डिसेंबरला त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्या सतत कामाला लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नाशिक शहरवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

- Advertisement -

१३ मार्च २०२२ पासून नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट लागू झाली आहे. तेव्हापासून शहरातील विकासकामे जवळपास रखडल्याचे चित्र आहे. तर मागील सुमारे एका वर्षापासून महापालिकेचा कारभार एकप्रकारे विस्कळीत झाला आहे. तत्कालीन आयुक्तांनी (Commissioner) अनेक वादग्रस्त विषयांना हात घालून त्यातून अर्थपूर्ण काम केल्याचे आरोप झाले, मात्र खत्री यांनी कामाचा पदभार हाती घेताच सिंहस्थात महत्त्वाचे स्थान असलेल्या रामकुंडासह गोदाकाठच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. विभागप्रमुखांना त्यांच्या कामाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देत आयुक्तपदाची जबाबदारी यश्स्वीपणे हाताळू शकतो, हे त्यांनी पहिल्याच दिवशी दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

YouTube video player

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त महापालिकेला भरपूर निधी मिळणार. त्यातून शहराचे काय चांगले करता येते याकडेदेखील त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे पर्याय शोधावे लागणार आहेत. यासाठी आयुक्तांकडून नियोजन कसे होणार हे पाहावे लागणार आहे. मनपाची आर्थिक स्थिती बेताची असून करसंकलन व नगररचना विभागावरच सर्व भार आहे. महापालिकेकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. ही बाब निदर्शनास येऊनही आधीच्या आयुक्तांनी घोषणाबाजीची भंपकबाजी करून उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र हा फुसका बारच ठरला. जिल्हाधिकारी कार्यलायात दर मंगळवारी सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत बैठक सुरू करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी सिंहस्थ कुंभमेळ्याचे सूक्ष्म नियोजन करायचे आहे. त्यामुळे खत्री यांना सिंहस्थ आराखड्याची अधिक माहिती घ्यावी लागेल.

ताज्या बातम्या

“दैवतं पळवण्याचा निर्लज्जपणा, गुजरातमध्ये सगळे बकासूर…”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून संजय...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीबाबत केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड...