नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहर निळेमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१४) जुने नाशिकमधून (Nashik) जल्लोषात मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता महत्त्वाच्या मार्गात वाहतूक बदल (Changes in Traffic ) करून वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे.
वाहनचालकांनी (Drivers) पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचनेद्वारे केले आहे. शहरातील मुख्य व नाशिकरोडची मिरवणूक दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत आणि पाथर्डी फाटा येथील मिरवणूक सायंकाळी पाचनंतर ती संपेपर्यंत वाहतुकीचे बदल अमलात असतील. जयंतीनिमित्त मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद असले तरीही पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना हे आदेश राहणार नाहीत.
मुख्य मिरवणूक मार्ग
राजवाडा (भद्रकाली) वाकडी बारव -महात्मा फुले मार्केट भद्रकाली मार्केट बादशाही कॉर्नर गाडगे महाराज पुतळा -मेनरोड धुमाळ पॉईंट – रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल नेहरू गार्डन – शालिमार – शिवाजी रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (समारोप)
पर्यायी मार्ग
- वाहनधारकांनी चौकमंडईकडून सारडा सर्कलमार्गे जावे. फुले मार्केट ते अमरधाम, टाळकुटेश्वर मंदिर ते पंचवटीकडे वाहने जातील.
दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बैंकमार्गे शालिमार, सीबीएसकडे जाणाऱ्या बसेस, अन्य वाहने दिंडोरी नाक्यावरून पेठफाटा, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नलमार्गे सिडको, नाशिकरोडकडे जातील-येतील.
पाथर्डी फाटा
प्रवेश बंद मार्ग
गरवारे पॉईंट ते पाथर्डी फाटा, पाथर्डी सर्कल, कलानगर, पेम सिग्नल रस्त्यावर दोन्ही बाजूने, तसेच पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा मार्गे डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरून अंबड-सातपूर लिंक रोडवर अवजड वाहनांना मनाई. तर नम्रता पेट्रोलपंप ते पाथर्डी फाटा रस्त्यावर दोन्ही बाजूने सर्व वाहनांना मनाई असेल.
पर्यायी मार्ग
गरवारे पॉईंटपूर्वीच्या ओव्हर ब्रीजमार्गे द्वारका, फेम सिग्नल ते द्वारकावरून ओव्हर ब्रीजमार्गे गरवारे, पाथर्डी गाव ते सातपूर-अंबडकडे जाण्यासाठी राणेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मार्गस्थ
नाशिकरोड मिरवणूक मार्ग
बिटको चौक क्वॉलिटी स्वीट मित्रमेळा ऑफिससमोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – देवी चौक – जव्हार मार्केट डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (समारोप)
प्रवेश बंद मार्ग
- उड्डाणपुलावरून खाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा मार्ग.
- दत्तमंदिरकडून बिटको सिग्नलकडून येणारा मार्ग
- रेल्वे स्टेशनकडून बिटकोकडे येणारा मार्ग
पर्यायी मार्ग
- सिन्नर फाटाकडून पुलाखालून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बिटको चौक, रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतूक सिन्नर फाटा येथून उड्डाणपुलावरून दत्तमंदिर चौक, दत्तमंदिर रोडने सुराणा हॉस्पिटल, सत्कार टी पॉईंट रिपोर्ट कॉर्नर येथून रेल्वे स्टेशन.
- रेल्वे स्टेशन येथून सुभाष रोडमार्गे परत दत्तमंदिर सिग्नलमार्गे जातील-येतील.
- नाशिककडून पुण्याकडे जाणारी वाहतूक दत्तमंदिर सिग्नलवरून वीर सावरकर पुलावरून सिन्नर फाट्याकडे जातील-येतील.
- नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातील बसेस दत्तमंदिर सिग्नलमार्गे सुभाषरोडवरून जातील.
- सीबीएसकडे येणारी वाहने नाशिकरोड न्यायालयासमोरून सरळ आर्टिलरी रोडमार्गे जयभावनी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलमार्गे पुढे जातील.