नाशिक प्रतिनिधी | New Nashik
लातूर येथे छावा क्रांतीवीर सेनेचे (Chhawa Krantiveer Sena) प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर बाहेर येताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्त छावा क्रांतीवीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयाबाहेर चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना छावा पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “हा हल्ला म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीवरचा नाही, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरचा आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणे गुन्हा आहे का? जर लोकशाहीच्या चौकटीत केलेल्या निवेदनालाही राजकीय (Political) गुंडगिरीने उत्तर दिले जाणार असेल, तर यापुढे कोणीही शांततेने आपला आवाज उठवू शकणार नाही”, असे म्हटले.
दरम्यान, यावेळी जिल्हाध्यक्ष आशिष हिरे,नवनाथ शिंदे,महानगरप्रमुख योगेश गांगुर्डे,विजय वाहूळे, आबा पाटील,सागर जाधव, योगेश पाटील,बबलू पाटील,अमोल शिंदे, मनोरमा पाटील, सविता वाघ, संगीता सूर्यवंशी,अमोल खांदवे, शुभम महाले,योगेश अहिरे, विशाल घागस,अमोल देवरे,राहुल भालेराव,समाधान पाटील यांच्यासह छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
लवकरात लवकर चव्हाण यांना अटक करून कारवाई झाली पाहिजे. पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी.येत्या काळात त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल.
योगेश गांगुर्डे, शहराध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना





