Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मुख्यमंत्री फडणवीस, DCM शिंदेंचे नाशकात आगमन; रामकाल पथाची केली...

Nashik News : मुख्यमंत्री फडणवीस, DCM शिंदेंचे नाशकात आगमन; रामकाल पथाची केली पाहणी

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वागत केले.

- Advertisement -

यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आदी उपस्थित होते.

दरम्यान, ओझर विमानतळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट रामकुंडावर जाऊन रामकाल पथाची पाहणी केली. यावेळी महापलिका आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांना विकासकामांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन आणि शिक्षण मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते.

रामकुंड परिसरातील विकासकामांचे भूमीपूजन

नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा गुरुवारी सकाळपासून नाशिकमध्ये नियोजित असून, रामकुंड परिसरात विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री श्री पंचवटी येथील प्रमुख धार्मिक स्थळांची पाहणी करून स्थानिक पदाधिकारी व अधिका-यांशी चर्चा करतील. रामकुंड परिसरात सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, तसेच सिंहस्थपूर्व नियोजनाशी संबंधित विविध प्रकल्पांचे काम सुरू असून, या प्रकल्पांच्या भूमीपूजनामुळे परिसरातील धार्मिक पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...