Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशकात आगमन

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशकात आगमन

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे काही वेळापूर्वी ओझर विमानतळावर (Ozar Airport) आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

- Advertisement -

यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सुहास कांदे, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे (Akhil Bhartiya Mahanubhav Parishad) ३८ वे अधिवेशन नाशिकमध्ये दि.२४ व २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून, या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. पंचवटी येथील जय शंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे हा सोहळा पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

IND vs PAK-W : आज भारत-पाकिस्तान महामुकाबला; कशी असेल Playing 11?

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ (ICC Women's T20 World Cup 2026) मध्ये रविवारी (दि.१४) क्रिकेट जगतातील सर्वात मोठी...