Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन-पोलीस शिल्प’चे अनावरण

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन-पोलीस शिल्प’चे अनावरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोलीस व सामान्य माणूस यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, या संकल्पनेतून पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन-1 येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉमन मॅन- पोलीस शिल्पाचे कॉमन मॅन व पोलीस कर्मचार्‍यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, कारागीर मोतीराम पवार, लक्ष्मण आतारकर, पोलीस शिपाई विशाल पवार यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेला दगड घडविण्याचे लक्ष्मण ऊर्फ साईबाबा शिवराम आतारकर (रा. बजरंगवाडी ), मोतीराम पवार (रा. पेठरोड, शनिमंदिर) यांनी केले. कॉमन मॅन म्हणून व विशाल पवार यांनी पोलीस कर्मचारी म्हणून शिल्पाचे अनावरण केले.

ताज्या बातम्या

युगेंद्र

Yugendra Pawar: अजित दादांना जाऊन सहा महिने…; युगेंद्र पवारांचा संताप, म्हणाले...

0
बारामती | Baramatiदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने उलटले आहेत. पण, अजूनही अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर युगेंद्र...