Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : वीज रोहित्राला स्पर्श झाल्याने बालकाचा मृत्यू

Nashik News : वीज रोहित्राला स्पर्श झाल्याने बालकाचा मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

येथील मालधक्का परिसरात उघड्या वीज रोहित्राला स्पर्श (Electric Current) झाल्याने ३ वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना सुभाषरोड परिसरातील जियाउद्दीन डेपो परिसरात घडली असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, तर अनेक ठिकाणी विद्युत डीपी या उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये (Citizens) संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

सुभाषरोड मटण मार्केट परिसरातील पवारवाडी भागात राहणारे उजमा नईम खान या जियाउद्दीन ओभागात बारदान शिवण्याचे काम करीत असून सोमवारी दुपारी ३ वाजेदरम्यान त्यांचा मुलगा उफान नईम खान ३ खेळत असताना उघड्या विद्युत रोहित्राला स्पर्श झाल्याने तो लांब फेकला गेला, उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यास उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. घटना कळताच माजी नगरसेवक असलम मणियार, रिपाइं नाशिकरोड शहर प्रमुख समीर शेख, नयना वाघ यांनी तत्काळ धाव घेतली.

YouTube video player

दरम्यान, या उघड्या विद्युत डीपीला (Electrical DP) मागे एकदा असाच एका युवकाचा स्पर्श झाल्याने हात गंभीर भाजल्याची घटना घडली होती. परिसरातील रहिवाशांनी याचाबत संबंधित विभागाला कळविले असता त्यांनी काहीच दखल घेतली नव्हती तर नाशिकरोड भागात अनेक ठिकाणी विद्युत डिपी या उघड्या अवस्थेत असून प्रशासन लक्ष देईल का, असा संतापजनक सवाल नागरिक करू लागले आहेत. उफान याचे वडील मोलमजुरी करीत असून त्याला पाच वर्षांची मोठी बहीण आहे

ताज्या बातम्या