Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News: सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प; नागरिकांचे हाल

Nashik News: सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प; नागरिकांचे हाल

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा आज सकाळपासून पुन्हा ठप्प झाली आहे. ४५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याआधीही सिटी लिंक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार थकल्याने त्यांनी आंदोलन केले होते. आता पुन्हा एक महिन्याचा पगार मिळाला नाही आणि अन्य काही मागण्यांसाठी आज सकाळपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यामुळे नाशिककरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

- Advertisement -

यापूर्वी तीन महिन्यापासून पगार थकला होता. तर, चालू महिन्याचाही पगार आता थकला असल्याने सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे व दोन वर्षांचा दिवाळीचा बोनस न मिळाल्यामुळे बुधवार पहाटेपासूनच सिटीलिंकच्या एकुण ४५० पेक्षा जास्त वाहकांनी संपाची हाक दिली असल्याने तपोवन बस डेपो तसेच नाशिक रोड बस डेपोतून एकही बस रस्त्यावर धावली नाही.

सकाळी ऐन वर्दळीच्या वेळी बस वाहकांनी संप पुकारल्याने प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून अनेक बस थांब्यांवर प्रवाश्यांची गर्दी दिसून आली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिले नसल्यामुळे पुन्हा एकदा कामबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, वाहकांनी आपल्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरुच राहील अशी भुमिका घेतली आहे.

काय आहेत मागण्या?

पीफ सात आठ महिन्यांपासून भरलेला नाही तो लगेच भरावा.

एस आयचे पैसे भरले नसल्याने मिळत नाही उपचार.

मागणी पूर्ण न झाल्याने अद्याप पावेतो हे सहावे आंदोलन.

विनातिकीट प्रवाशी करून ३६४ रुपये दंड केला जातो, मात्र तो दंड वाहकाला तीन ते पाच हजार केला जातो तो बंद करावा.

दोन वर्षांपासून पगार वाढ झालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या