Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : सिटिलिंक बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

Nashik News : सिटिलिंक बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका बस सेवा अर्थात सिटीलिंकच्या बस (Citilink Bus) चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज (दि.२७) सकाळपासून पुन्हा संपाची (Strike) हाक दिल्याने शहरातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. तर दुसरीकडे रिक्षासह इतर वाहनांची काही ठिकाणी मनमानी पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

चालक आपल्या मूळ वेतनात १२ हजारांची वाढ करण्यासह प्रोत्साहन भत्ता वाढवून देण्याच्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे ही संपाची हाक देण्यात आली आहे. सिटीलिंक कंपनी प्रशासन आणि महापालिका परिवहन महामंडळाकडून निर्णय न झाल्याने आज शनिवारपासून पुन्हा संप पुकारला आहे. त्यामुळे शहराची बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. नाशिककरांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून महत्वाची ठरणारी सिटिलिंक बससेवा सुरू झाल्यापासून तीन वर्षात प्रशासनाच्या निष्काळजी व ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांना तब्बल नऊ वेळा संप पुकारावा लागला आहे.

दरम्यान, सध्या कामगारांना मिळत असलेल्या मुळ वेतनात १२ हजार रूपये वाढ मिळावी. तर सध्या २६ दिवसांच्या हजेरीवर ७०० रूपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो तरी २४ दिवसांच्या हजेरीवर १४०० रूपये इतकी वाढ देण्यात यावी, अशा मागण्यांसाठी हा संप मनसेना कर्मचारी संघटनेतर्फे पुकारण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...