Thursday, September 10, 2026
HomeनाशिकNashik News: बडगुजर-शहाणेंमध्ये प्रभाग समितीच्या सभेत वाद; महिला नगरसेवकांसमोरच शिवराळ भाषेचा वापर

Nashik News: बडगुजर-शहाणेंमध्ये प्रभाग समितीच्या सभेत वाद; महिला नगरसेवकांसमोरच शिवराळ भाषेचा वापर

शहाणे सभागृहाची माफी मागतांना मला कुणाचेही मन दुखवायचे नव्हते असे भाष्य करत सभागृहातून काढता पाय घेतला. तर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देखील निवडणुकीच्या काळात कुणाच्या भावना दुखावल्या असतील पण सभागृहातील प्रकाराबद्दल दिलगिरी केली.

नविन नाशिक | प्रतिनिधी
नवीन नाशिक प्रभाग समितीच्या तब्बल चार वर्षांनी झालेल्या पहिल्याच प्रभाग सभेत पाणी टंचाई, गढूळ पाणी पुरवठा, ड्रेनेज समस्या उद्यान समस्या या विषयांवर सर्वच नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान प्रभाग सभा सुरु होताच बडगुजर आणि शहाणे वाद पुन्हा एकदा उफाळून आला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वादावादीत होत हे प्रकरण थेट शिवीगाळे पर्यंत पोहोचल्याने प्रभाग समितीच्या सभेतील वातावरण काही वेळ तणावाचे निर्माण झाले होते.

नेमकं काय घडलं?
नवीन नाशिक प्रभाग समितीची बैठक सभापती बाळकृष्ण शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगरसेविका साधना मटाले यांनी गढूळ पाण्याच्या बाटल्या सभापतींना देत असतांना मुकेश शहाणे यांनी सुधाकर बडगुजर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केला. त्यानंतर बडगुजर यांनी देखील शहाणे यांच्यावर तोंडसुख घेतले. यावेळी उपस्थित नगरसेवक मुरलीधर भामरे यांनी दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

आधी शिवीगाळ मग मागितली माफी
दरम्यानच्या काळात सभागृहाचे वातावरण तापले होते तर महिला लोकप्रतिनिधींनी यावेळी उघड नाराजी बोलून दाखवली. यावेळी शहाणे सभागृहाची माफी मागतांना मला कुणाचेही मन दुखवायचे नव्हते असे भाष्य करत सभागृहातून काढता पाय घेतला. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देखील बोलतांना सांगितले कि, निवडणुकीच्या काळात कुणाच्या भावना दुखावल्या असतील पण सभागृहातील प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे सांगितले.

प्रभाग सभा सुरु होण्याअगोदर प्रभाग २९ चे नगरसेवक भूषण राणे यांनी प्रभागातील नागरिकांसह सभागृहाच्या प्रवेश द्वारावरच पाणी प्रश्नी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

यांची प्रभाग सभेला दांडी
नगरसेवक राजेंद्र महाले, किरण राजवाडे, दिपक दातीर यांनी प्रभाग सभेला दांडी मारली. तर काही नगरसेवक केवळ हजेरी लावण्यापुरतेच उपस्थित होते.

ताज्या बातम्या

राज

“देशाच्या राजधानीचे महत्व संपवण्याचा प्रयत्न सुरु”; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन राज...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राजधानी दिल्लीतून गुजरातमध्ये हलवण्यावरून देशात नवा वाद सुरु झाला आहे. विरोधकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून धारेवर धरले आहे. शिवसेना...