नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा परिषदेला (Nashik Zilla Parishad) अतिशय सुंदर आणि भव्य अशा नव्या इमारत मिळाली आहे. ही इमारत महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वांत मोठ्या जिल्हा परिषद इमारतींपैकी एक आहे. तिचे डिझाईन उत्कृष्ट असून बांधकामही दर्जेदार झाले आहे. ही इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होऊन जिल्हा परिषदेच्या कामकाजाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे गुरूवारी (दि.१३) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महाराष्ट्र शासन विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे समिती प्रमुख आमदार सुहास कांदे, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे व डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, दिलीप बनकर, नितीन पवार, किशोर दराडे, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, डॉ. राहुल आहेर, मंगेश चव्हाण, राहुल ढिकले, प्रा. देवयांनी फरांदे, पंकज भुजबळ व मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अब्दुल खालिक, ग्रामविकासचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी नाशिकची इमारत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे. सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओमकार पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थितीतांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, कंत्राटदार अभिजीत बनकर यांसह विभागप्रमुख उपस्थित होते.
यांची विशेष उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, विजयश्री चुंभळे, बाळासाहेब क्षीरसागर, मायावती पगारे, पंढरीनाथ थोरे, माजी सभापती मनीषा पवार, अलका जाधव, यतिंद्र पगार यांसह माजी सदस्य अमृता पवार, लता बच्छाव, नूतन आहेर, जे.डी, हिरे, यशवंत ढिकले, उदय जाधव, सुरेश कमानकर, प्रविण गायकवाड, अशोक टोंगारे, विनायक माळेकर, गोरख बोडके, विलास बच्छाव, बाळासाहेब माळी आदी उपस्थित होते.




