Monday, April 21, 2025
HomeनाशिकNashik News : मुख्यमंत्री घेणार सिंहस्थ तयारीचा आढावा; आज मंत्रालयात बैठक

Nashik News : मुख्यमंत्री घेणार सिंहस्थ तयारीचा आढावा; आज मंत्रालयात बैठक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर सिंहस्थात महत्वपूर्ण ठरणाऱ्या रिंगरोडच्या कामाचे सादरीकरण सोमवारी (दि. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासमोर संबंधित विभागाकडून करण्यात येणार आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

नाशिक व त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थाच्या नियोजनासाठी बैठका घेण्यात येत आहेत. मात्र अंतिम आराखड्याला मंजुरी मिळत नसल्याने सिंहस्थाची कामे प्रत्यक्षात सुरू होण्यास विलंब होत आहेत. त्यातच सर्वाधिक वेळ लागणारा आणि सर्वाधिक खर्चिक प्रकल्प रिंगरोडचा आहे. दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना बाह्य रिंगरोडचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रिंगरोडचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एमएसआरडीसी सादर केला होता. एमएसआरडीसीने या प्रकल्पासाठी पुण्यातील मोनार्क या सल्लागार संस्थेमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. मोनार्क या सल्लागार संस्थेने महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पाथर्डी ते आडगाव दरम्यान ६० मीटर रुंदीचा बाहा रिंगरोड, तसेच आडगाव ते गरवारे पॉइंट या दरम्यान ३६ मीटर रुंदीचा बाहा रिंगरोडचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला होता.

नवीन भूसंपादन कायद्यानुसार मनपा हद्दीत रिंगरोडसाठी (Ring Road) भूसंपादन मोबदल्यापोटी अडीच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च जास्त असल्याने मोनार्क कंपनीने एनएमआरडीएच्या हद्दीतही सर्वेक्षण केले होते. बीओटीवर रिंगरोड उभारणीचा प्रस्ताव कंपनीने एमएसआरडीसीला दिला होता. या दोन्ही प्रस्तावांचे सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीसांसमोर केले जाणार आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

BCCI Annual Contract : बीसीसीआयकडून वार्षिक करारामधील खेळाडूंची यादी जाहीर, पाहा...

0
मुंबई | Mumbai भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुरूष संघाच्या केंद्रीय वार्षिक कराराची (१ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५) यादी जाहीर केली आहे. यात...