Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Cold News : थंडीची चाहूल; एका दिवसात तापमानात चार अंशांनी घट

Nashik Cold News : थंडीची चाहूल; एका दिवसात तापमानात चार अंशांनी घट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर व जिल्ह्यात (City and District) तापमानात लक्षणीय घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. नोव्हेंबर महिना लागताच २२ अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान (Temperature) घसरून गुरुवारी १८.२ अंश सेल्सिअसवर आले. शुक्रवारी (दि.७) तर त्यात चार अंशाने घट होत ते १४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. यानंतर आज (शनिवारी)नाशिकचा पारा १३.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रात्रीचा गारठा वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दिवसाचे तापमान मात्र कायम असून शुक्रवारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शनिवार (दि.८) पासून दुपारी ३ वाजेचे कमाल व पहाटेचे ५ वाजेचे किमान अशा दोन्हीही तापमानात महाराष्ट्रात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घसरण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात थंडीला (Maharashtra Cold) सुरवात होण्याची शक्यता जाणवते, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

दरम्यान, मंगळवार दि.११ नोव्हेंबरपासून तर पहाटेचे ५ वाजेचे किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या महाराष्ट्रात भागपरत्वे कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान जाणवत आहे, असेही खुळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....