Saturday, October 24, 2026
HomeनाशिकNashik News : गणेश विसर्जनासाठी अधिकृत स्थळांचाच वापर करा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या...

Nashik News : गणेश विसर्जनासाठी अधिकृत स्थळांचाच वापर करा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी प्रसाद

नाशिक | Nashik

आगामी गणेश विसर्जन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी गणेशभक्त व नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन प्रशासनाने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांवरच करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

पावसाळ्यानंतर नदीपात्रातील पाण्याची खोली अनेक ठिकाणी अनिश्चित व असमान असते. त्यामुळे अनधिकृत अथवा धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरणे जीवघेणे ठरू शकते. यापूर्वी नदीपात्रात उतरताना बुडून दुर्घटना घडल्याच्या घटना लक्षात घेता, नागरिकांनी गणेश विसर्जनावेळी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी (Collector) आयुष प्रसाद यांनी केले आहे.

प्रशासनाने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुरक्षित प्रवेशासाठी योग्य घाटांची व्यवस्था करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जीवरक्षक (डायव्हर्स) व ‘आपदा मित्र’ तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा बंदोबस्त, बोटींद्वारे नियमित गस्त आणि पुरेशा प्रकाश व्यवस्थेची सुविधा करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनामुळे नदी व जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये यासाठीही प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विसर्जनानंतर संबंधित ठिकाणी स्वच्छता व प्रदूषण नियंत्रणासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे. काही वेळा गर्दी टाळण्यासाठी किंवा घाईगडबडीत नागरिकांकडून अनधिकृत ठिकाणी विसर्जन करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अशा ठिकाणी पाण्याची खोली, प्रवाह व नदीपात्राची स्थिती धोकादायक असू शकते. त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन अधिकृत विसर्जन स्थळांचाच वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

तसेच गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) उत्सव आनंदात, भक्तिभावाने आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...