नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर पोलिसांच्या (City Police) गुन्हेशाखेत (Crime Branch) मागील महिन्यांत कायद्याच्या बालेकिल्ला ‘पॅटर्न’ मधून अनेकांनी कडक मेजवानीचा आस्वाद चाखला असतानाच ‘जनताच मालक’ म्हणणाऱ्या एकाला पथकाने चांगलाच पाहुणचार दिला.
तक्रार अर्ज (Complaint Application) देण्यासाठी गेलेल्या त्या राजकीय पुढाऱ्याला सशस्त्र व तंदुरुस्त पोलिसांनी खास पोलिसी इंगा दाखवला. लाईव्हद्वारे राज्यभरात चर्चेत आणि वादात असलेल्या या पुढाऱ्याचे व्हूज कमीच झाल्याची चर्चा आयुक्तालयात रंगली.
शहर मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात एका संशयिताकडे तपास सुरु असताना भाव दाखवून एक ‘प्लास्टो मालक’ तेथे पोहोचला. सध्या ‘मॅग्झिमो ‘सोडून इतरांसह फिरणारा ही व्यक्ती युनिट एकजवळ कागदपत्र घेऊन आलाच. तेव्हा युनिट एकच्या कार्यालयाबाहेर (Unit One Office) उभ्या तंदुरुस्त कमांडोंना त्याच्यासंदर्भात माहिती नव्हती.
संशयित (Suspected) असल्याचे समजून त्यांना नेहमीच्या ‘पॅटर्न’ प्रमाणे आस्वाद देण्यात आला. मात्र, मनातले भाव तोंडावर आल्याने त्याने जोरजोरात हाक देण्यास सुरुवात केली. तेव्हा टोपीही पडली. ही, टोपी शोधण्यासाठी प्लास्टोमालक थबकत तेथे गेल्याचे कळते.
कुलकर्णीची धुलाई
राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नागपुरातील संशयित कुलकर्णीने पोलीस आयुक्तालयात येऊन अरेरावी केली, त्याला गुन्हेशाखेने कायद्याचा बालेकिल्ला दाखविताच, त्याने विनवणी केल्याचे समजते. आयटी इंजिनिअर असलेल्या दक्षिण भारतीयास या कुलकर्णीने देशातील कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देण्यासाठी १५ कोटींना गंडा घातला होता. तो नवी ऑफर घेऊन येताच त्यालाही मेजवानी देण्यात आली.




