नाशिक | Nashik
नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या (Commissioner of Tribal Development Department) आयुक्त नयना गुंडे (Nayana Gunde) यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड कारभार सांभाळणार आहेत.
नयना गुंडे यांची नियुक्ती राज्याच्या महिला व बाल कल्याण आयुक्तपदी (Commissioner) झाली आहे.नयना गुंडे यापूर्वी गोंदीयाच्या जिल्हाधिकारी होत्या. तेथून त्या आदिवासी आयुक्त म्हणून आल्या. हिरालाल सोनवणे यांची मुंबईतील दुग्ध विकास विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नयना गुंडे यांची नियुक्ती झाली होती.
तर लीना बनसोड (Lena Bansod) या नाशिक जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. दरम्यान, आज ९ सनदी अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात नाशिक जिल्ह्याचे रहिवासी असलेले राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी यांची कोकण विभागाचे महसुल आयुक्तपदी बदली झाली आहे.