Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : कृषीमंत्री कोकाटेंसह नाशिक जिल्हा बँकेच्या २५ माजी संचालकांना सहकार...

Nashik News : कृषीमंत्री कोकाटेंसह नाशिक जिल्हा बँकेच्या २५ माजी संचालकांना सहकार विभागाची नोटीस

नेमकं प्रकरण काय?

नाशिक | Nashik

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांच्यासह नाशिक जिल्हा बँकेच्या (Nashik District Bank) २५ माजी संचालक किंवा त्यांच्या वारसांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३४७ कोटींच्या कर्जवाटपात १८२ कोटींची अनियमितता झाल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) विविध पक्षांच्या बड्या राजकीय नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

- Advertisement -

सहकार विभागाने (Cooperation Department) बजावलेल्या नोटीसमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे या विद्यमान लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. कलम ८८ अंतर्गत अडीच वर्षाची चौकशी केल्यानंतर संशयास्पद कर्ज वितरित केल्याप्रकरणी १५ अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता असून १८२ कोटींच्या वसुलीप्रकरणी ४४ जणांची येत्या ०२ एप्रिल २०२५ रोजी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Minister Babasaheb Patil) यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

जिल्हा बँकेतील कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी कलम चौकशी केली होती. त्या चौकशीत नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, रेणुका यंत्रमाग औद्योगिक संस्था, आर्मस्ट्राँग साखर कारखाना, तसेच म्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सोसायटी आदी संस्थांना झालेल्या कर्जाच्या वाटपात अनियमितता झाल्याचे समोर आले होते. यानंतरच सहनिबंधकांनी अनियमितता झाल्याचा ठपका २९ आजी-माजी संचालक आणि १५ अधिकाऱ्यांविरोधात १८२ कोटींची वसूली निश्‍चित केली होती. तसेच या सर्वांना वसुलीच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी ठापका असणाऱ्यांनी तत्कालीन सहकार मंत्र्यांसमोर आपील करत या प्रकरणावर स्थगिती आणली होती. पण आता सहकार विभागाचे कक्ष अधिकारी सोपान आरोटे यांनी या प्रकरणी पुन्हा एकदा नोटीस काढल्याने खळबळ उडाली आहे. या नोटीसप्रमाणे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह २५ संचालकांना नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...