Saturday, May 4, 2024
Homeनाशिकतडीपाराकडून धारदार कुकरी हस्तगत

तडीपाराकडून धारदार कुकरी हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी

शहरातून एक वर्षांंसाठी तडीपार केलेल्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एककडील पथकाने प्राणघातक शस्त्रासह अटक केली आहे. राेहीत खंडू गांगुर्डे असे संशयिताचे नाव आहे…

- Advertisement -

दि. ५ फेब्रुवारी राेजी रोजी युनिट एकचे सपोनि दिनेश खैरनार, एएसआय काळु बेंडकुळे, हवालदार प्रविण कोकाटे, पाेलीस नाईक योगीराज गायकवाड, महेश साळुंके, प्रविण वाघमारे,

शिपाई राम बडे असे कार्यालयात असतांना हवालदार कोकाटे यांना मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील संशयित तडीपार रोहीत खंडु गांगुर्डे हा पंचवटी शिवारातील मुंजोबा चौक, फुलेगनर, पंचवटी येथे येणार आहे आणि त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे कळाले.

ही माहिती संबंधितांनी युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना कळवली. त्यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून मुंजोबा चौकात पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रोहीत पोलीसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला.

तेंव्हा त्याला पकडून ताब्यात घेतले. त्याच्या कंबरेला ३०० रूपये किंमतीची धारदार कुकरी मिळून आली. तो कोणतीही परवानगी न घेता वावरतांना मिळून आल्याने त्याच्या विरुध्द पंचवटी पोलीस ठाणेस आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या