Thursday, April 30, 2026
Homeक्राईमNashik News: नाशिकरोडला बेकरी चालकावर गोळीबार; तरुण थोडक्यात बचावला

Nashik News: नाशिकरोडला बेकरी चालकावर गोळीबार; तरुण थोडक्यात बचावला

नाशिक रोड | प्रतिनिधी

जय भवानी रोडवर असलेल्या श्री संत सावता माळी बेकरी अँड स्वीट्स च्या दुकानावर एका अज्ञात हल्लेखोराने बेकरीच्या मॅनेजरवर एक गोळी फायर करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित तरुण त्यातून थोडक्यात बचावला असून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. संशयित हल्लेखोर पाऊस असल्यामुळे व अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.

- Advertisement -

जय भवानी रोडवर नितीन गाडेकर यांचे श्री संत सावता माळी स्वीट अँड बेकरी चे दुकान असून या ठिकाणी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक अज्ञात हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधेल दुचाकी गाडीवर आला व त्याने अंधाराचा फायदा घेऊन या बेकरीचे मॅनेजर मंजूर सय्यद यांच्या कानाला रिवाल्वर लावून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सय्यद यांनी त्याचा हल्ला हुकवला. परिणामी या घटनेनंतर संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित घटनेची माहिती घेऊन हल्लेखोर ज्या दिशेने फरार झाला आहे, त्या बाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोर कोण आहे व त्याने गोळीबार का केला याबाबतचे गूढ अद्याप उकलले नाही याबाबत उपनगर पोलीस कसून तपास करत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : ट्रॅफिक पार्कचा अपमृत्यू

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकमध्ये आणखी एका चांगल्या उपक्रमाचा अपमृत्यू होऊ घातला आहे. निओ मेट्रो व आयटी पार्क या महायुतीच्याच...