Sunday, January 18, 2026
HomeनाशिकNashik Crime : निवडणुकीतील पराभवानंतर वसूलीसाठी राडा; शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यासह साथीदारांवर दरोडा,...

Nashik Crime : निवडणुकीतील पराभवानंतर वसूलीसाठी राडा; शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यासह साथीदारांवर दरोडा, खंडणीचे गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Election) रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १८ मध्ये पराभवाच्या धक्क्यातून राजकीय राडा उफाळून आला. शिंदे गटाचे पदाधिकारी व सध्या काही गुन्ह्यांत पसार असलेले पवन पवार, त्याचा भाऊ विशाल आणि पंधरा ते सतरा जणांनी आई आशा चंद्रकांत पवार यांच्या निवडणुकीचा खर्च वसूल करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी व पराभूत उमेदवारांकडून खंडणी मागून दरोडा टाकल्यासह धमकावल्याचे दोन स्वतंत्र गुन्हे नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. निवडणूक निकालानंतर घडलेल्या या घटनांनी विजयी उमेदवारांची धाकधूक वाढली असून प्रभागात दहशत पसरली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

शिंदे गटाच्या पराभूत उमेदवार व पवन पवारची (Pawan Pawar) आई आशा चंद्रकांत पवार यांचा निवडणूक खर्च वसूल करण्यासाठी पवनसह विशालच्या सांगण्यावरुन शिंग्या व साथीदारांनी भाजपचे विजयी उमेदवार शरद मोरे यांच्या घरात शिरुन त्यांना मारहाण करीत ५० लाख रुपयांची मागणी करीत दरोडा टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी (दि.१६) सकाळीच पवनचा खास कार्यकर्ता शिंग्या याने प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित उर्फ शिवा गाडे यांच्याकडे निवडणुकीचा (Election) खर्च वसूल करण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. एवढेच नव्हे तर पैसे न दिल्यास गोळीबार करून ठार मारण्याची धमकी दिली.

हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळताच भाजप शहराध्यक्षांनी शिंदे सेनेला डिवचलं; म्हणाले, “आता त्यांनी विरोधी…”

दरम्यान, गाडे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विजय अशोक सिंग उर्फ शिंग्या हा पवनचा खास कार्यकर्ता असून त्याने गाडे यांना मतमोजणीदरम्यान सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजजवळ अडवून तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. “निवडणुकीत मोठा खर्च झाला आहे, तो तुझ्याकडून वसूल करायचा आहे,” असे धमकावत पैशांची (Money) मागणी केली. गाडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयिताने थेट गोळीबार करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर भयभीत झालेल्या रोहित गाडे यांनी पोलिसांकडे धाव घेत प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सिंगला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

विजयी उमेदवाराची लूट

गीता चिंतामण मोरे (रा. मोरे मळा, एकतानगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, (दि. १६) सायंकाळी शरद हे घरी असताना संशयित यश गरुड, दीपक सदाकळे, विजय सिंग उर्फ शिंग्या, बंटी काळे, किरण गाटोळे, शुभम आदमाने, सचिन तोरणे उर्फ घोड्या, अनुराग सांगवान उर्फ मिताले, भुऱ्या खेडकर, प्रशांत सदाफळ घरात शिरले. त्यांनी पवन व विशाल पवार यांची आई आशा पवार यांच्या पराभवाचा राग मनात धरून पवार यांच्या सांगण्यानुसार मोरे यांना मारहाण करुन निवडणूकीतील पन्नास लाखांचा खर्च मागितला. मारहाणीदरम्यान, गीता यांनी मोरे यांना वाचवण्यासाठी मध्यस्थी केली असता त्यांनाही धारदार शस्त्राच्या मुठीने मनगटाला दुखापत केली. तसेच, गळ्यातील बेन्टेक्सचा हार सोन्याचा समजून हिसकावून नेला, असे नमूद आहे.

हे देखील वाचा :  Nashik MC Election : तब्बल ‘एवढे’ नवीन चेहरे पहिल्यांदाच करणार महापालिकेत प्रवेश; वाचा प्रभागनिहाय यादी

ताज्या बातम्या

Sanjay Raut on Mumbai Mayor : संजय राऊतांनी मुंबईतील सत्तेचा सस्पेन्स...

0
मुंबई । Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, सत्तेचे समीकरण आणि महापौरपदाचा सस्पेन्स आता अधिकच गडद झाला...