Monday, April 14, 2025
HomeनाशिकNashik News : द्राक्ष निर्यात एक लाख मेट्रिक टन टप्पा पार; भाव...

Nashik News : द्राक्ष निर्यात एक लाख मेट्रिक टन टप्पा पार; भाव समाधानकारक

अवकाळीचा फटका, निर्यातीत घट

लासलगाव | हरून शेख | Lasalgaon

द्राक्षपंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ३१ मार्च आर्थिक वर्षअखेरपर्यंत ८ हजार कंटेनरमधून १ लाख १० हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात (Export) झाली आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष (Grape) उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत २० टक्के घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून युरोपियन देशांसह रशिया, फ्रान्स, युक्रेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलँड, स्वीडन, पोलंड, स्पेनसह आदी देशांत द्राक्ष निर्यात होते. उत्पादनात २० टक्के घट होऊनही, यंदा निर्यात झालेल्या द्राक्षांना ९० ते १२५ रुपये प्रति किलो दर मिळाल्याने उत्पादकांत समाधानी वातावरण आहे.

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) उत्पादनात घट झाली असली तरी, चांगल्या दरांमुळे शेतकऱ्यांना काही दिलासा मिळाला प्रमाणात आहे. द्राक्ष निर्यातीत घट झाल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा आणि हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी अधिक तयारी करणे आवश्यक आहे, असे मत द्राक्ष निर्यातदार व्यापारी लखन सावलकर यांनी व्यक्त केले. सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन करावे, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांकडून होत आहे.

द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्यात असून यंदा माल कमी आहे. द्राक्षनिर्यातीत मागील हंगामाच्या तुलनेत महिन्यापूर्वी घट दिसत होती. मात्र गेल्या पंधरवड्यात निर्यातीत वाढ झाल्याने नाशिकमधून १ लाख १० हजार टन द्राक्ष निर्यात झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत २० टके निर्यातीत घट झाली आहे. जगभरातून नाशिकच्या गोड आणि रसाळ द्राक्षांना वाढती मागणी
असताना तुलनेत द्राक्षाचा पुरवठा कमी असल्याने चार महिने पूर्ण हंगामात दरात तेजी दिसून आली.

रशिया, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीसाठी मागणी बाढली होती. यंदाच्या हंगामात द्राक्षाचे खुडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले. त्यावेळी द्राक्षांना ११० ते १३० रुपये इतका चांगला दर मिळाला. गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांना सातत्याने नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत होते. करोनाकाळानंतर चार ते पाच वर्षांनी द्राक्षांना चांगला भाव मिळाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली.

नेदरलॅण्डला सर्वाधिक निर्यात

रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलैंड, स्वीडन, स्पेन या देशांत नाशिकमधून द्राक्ष निर्यात झाली. यंदादेखील सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबईमार्गे समुद्र प्रवासाने पोहोचले आहेत.

कंटेनर भाडेवाढ

रशिया-युक्रेन युद्धाची धग अजूनही सुरू असून, त्याचा फटका निर्यातदारांना बसला आहे. युद्धामुळे द्राक्षांची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गे लांबचा पल्ला गाठून सुरू आहे. त्यामुळे कंटेनरचे भाडेही वाढले आहे याचाही फटका निर्यातीला बसला आहे.

अवकाळीचा परिणाम

द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू हंगामात द्राक्ष निर्यात २० टक्के कमी झाली आहे.

  • लखन सावलकर, द्राक्ष निर्यातदार व्यापारी, कोकणगाव

देशाची द्राक्षनिर्यात

वर्ष मेट्रिक टनउलाढाल
२०१९-२०१,९३,६९० मॅट्रिक टन२,१७७ कोटी
२०२०-२१२,४६,१०७ मॅट्रिक टन २,२९८ कोटी
२०२१-२२ २,६३,०७५ मॅट्रिक टन २३०२ कोटी
२०२२-२३२६७९५० मॅट्रिक टन २,५४३ कोटी
२०२३-२४३,४३,९८२ मॅट्रिक टन३,४६० कोटी
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : भीमोत्सवामुळे वाहतुकीत बदल; नाशिक शहरासह नाशिकरोड व पाथर्डी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहर निळेमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१४)...