Friday, May 24, 2024
Homeनाशिकलष्करी जवानांच्या कुटुंबियांना सायबर सिक्युरीटीचे धडे

लष्करी जवानांच्या कुटुंबियांना सायबर सिक्युरीटीचे धडे

नाशिक | प्रतिनिधी 

लष्करी अधिकारी आणि जवान यांच्या कुटुंबियांसाठी ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या प्रोग्राममध्ये सायबर तज्ञ तन्मय स दीक्षित यांनी उपस्थित महिलांना आणि कुटुंबियांना सोशल मिडीयाचा सावधानतेने कशाप्रकारे वापर केला जाऊ शकतो याबाबत धडे दिले.

- Advertisement -

दीक्षित यांनी सोशल मीडियाचा वापर आपण कशाप्रकारे करू शकतो, हाच वापर करत असताना आपण आपली गुप्तता कशी घेऊ शकतो, तसेच आपल्या मुलांना जेव्हा आपण इंटरनेट देतो तेव्हा ते त्याला बळी पडणार नाहीत पण त्याचा सदुपयोग कसा करून घेऊ शकतो यावरती मार्गदर्शन केले.

इंटरनेट वापर ही काळाची गरज झालेली आहे आणि त्याच्यासोबत लहान मुलांना जर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल फोन, टीव्ही, इंटरनेट वापरायला नाही दिले तर ते या अत्याधुनिक युगात दुबळे बनू/पडू शकतात.

मुलांना त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोबाईल तसेच लॅपटॉप सुद्धा दिले जातात पण बऱ्याचदा आई वडील यांना मोबाईल आणि लॅपटॉपमधील अत्यावश्यक एवढेही ज्ञान नसल्यामुळे ते त्याच्यापासून दूर राहतात. त्यांना आपली मुले इंटरनेटवरती बरोबर काम करत आहेत का दुसरंच काहीतरी भलतेसलते प्रकार करत आहेत हे लक्षात येत नाही.

सोशल ऍप्लिकेशन्स वापरताना अशा प्रकारे काळजी घ्या

१. स्वतःचे नाव, पत्ता, घरातील फोन नंबर तसाच मोबाईल नंबर, व्हाट्सअपचा नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, ड्रायव्हिंग लायसनची इन्फोर्मेशन अथवा एज्युकेशन डॉक्युमेंट वगैरे तसेच आपल्याला कुठल्याही प्रकारचे मिळालेले सर्टिफिकेट हे सोशल मीडियावरती व्हायरल करू नयेत. म्हणजेच हे अपलोड करताना तेथील प्रायव्हसी सेटिंग नीट बघावी जेणेकरून आपले फॅमिली मेंबर जेवढे सोशल प्लॅटफॉर्म वरती आहेत त्यांनाच दिसेल. इतर कुठल्याही सोशल मीडियावरील वापर करणारे त्याचा गैरफायदा घेऊ शकणार नाही.

२. सोशल मीडियावरती कधीही लाईव्ह लोकेशन तसेच जीपीएस ऑन करून फोटो काढणे किंवा व्हिडिओ काढणे, आपले महत्वाचे कुठलेही कोड तेथे येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

ऑनलाइन खरेदी किंवा विक्री करताना काय काळजी घ्यावी

१. विकण्यासाठी कुठलेही प्रॉडक्ट जर का सोशल मीडियावरती अपलोड करणार असाल तर त्यात स्वतःचा फोन नंबर देऊ नका. समोरच्या व्यक्तीला ई-मेलच्या माध्यमातून संपर्क करावयास सांगा. जेणेकरून तुमची स्वतःची गुप्तता योग्यप्रकारे तुम्हाला ठेवता येईल. तसेच काही खरेदी करावयाची असेल तर ते प्रॉडक्ट डोळ्यासमोर बघितल्या नंतरच विकत घ्या.

२. कुठलेही नवीन प्रोडक्ट विकत घेणार असाल तर ते प्रॉडक्ट कोण विकत आहे ते बघा. सोशल प्लेटफॉर्मवरती त्याची रिव्ह्यू आपल्याला मिळतील ते पहिल्यांदा वाचा, जेणेकरून जर तो बनावट प्रॉडक्ट देत असेल आणि आधी कोणाला मिळालेले असतील तर त्यांनी रिपोर्ट केलेले आपल्याला तेथे दिसू शकते.

३. स्वतःचा “ओटीपी किंवा पासवर्ड” कोणीही किती प्रकारच्या वेगवेगळ्या ऑफर सांगितल्या किंवा तुमची विविध प्रकारची सीक्रेट माहिती सांगितली आणि विश्वास संपादन करायचा प्रयत्न केला तरी ते सांगू नयेत.

४. इंटरनेटवरती बरेच ॲप्लिकेशन्स आणि वेबसाइट असतात, त्यामधील काही वेबसाइट्स आणि ॲपलिकेशन हे कॉलिंगच्या सर्विसेस देतात आणि आंतरराष्ट्रीय कॉलिंग करताना आपल्याला हवा तो नंबर समोरच्या मोबाईलवरती दाखवता येऊ शकतो. याच गोष्टीचा गैरफायदा हॅकर्स आणि क्रिमिनल्स घेऊन तुम्हाला गंडा घालून तसेच फसवून माहिती चोरू शकतात. त्यामुळे आलेला मेसेज अथवा कॉल नेहमी खराच आहे असे समजू नका.

आपल्या लहान मुलांची काळजी कशाप्रकारे घ्यावी.

१. लहान मुलांसाठी जे ॲप्लिकेशन्स आणि बौद्धिक गेम आहेत तेच त्यांच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून द्या जेणेकरून या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांना ज्ञानासोबत एंटरटेनमेंटसुद्धा होईल.

२. आपली लहान मुले इंटरनेट वापरत असतील तर त्यांचे इंटरनेट वापरण्यासाठी ठराविक वेळ ठेवा आणि ठराविक डेटा त्यांना द्या जेणेकरून ते इंटरनेट एडिट करू शकणार नाहीत.

३. शरीर तंदुरुस्त आणि मजबूत राहावे याच्यासाठी मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे जेणेकरून मोबाईलच्या अतिवापराने डोळ्यांना कमी दिसणे तसेच कानाला कमी ऐकू येणे असे शारीरिक त्रास होणार नाहीत.
इंटरनेट वापरताना महिलांनी त्यांच्या स्वतःची तसेच घरातील व्यक्तींची, मुलांची सायबर सुरक्षा कशाप्रकारे करावी याच्यावरती महिला सायबर सुरक्षा कार्यक्रमात, देवळालीमध्ये, वरील टिप्स श्री तन्मय दीक्षित, सायबर एक्सपर्ट यांनी बोलत असताना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या