दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
मनमाड शहरासाठी (Manmad City) महत्त्वपूर्ण असलेल्या करंजवण-मनमाड (Karanjavan-Manmad) थेट जलवाहिनी पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे खेडगाव, शिंदवड येथील शेतकर्यांचे द्राक्ष, टोमॅटो आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजना ही जवळजवळ साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा प्रकल्प अवघ्या दीड वर्षात पूर्णत्वास नेण्यात आला आहे. अद्यापही या योजनेचे काही कामे सुरू आहे. उद्घाटन होण्यापूर्वी या योजनेचे तीन ते चार वेळा जलपूजन देखील झाले आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) चाचण्या देखील घेण्यात आल्या आहे. यापूर्वीही अनेक ठिकाणी ही पाईपलाईन फुटली असून अनेक शेतकर्यांचे छोटे मोठे नुकसान झालेले आहे. खेडगावजवळ असलेल्या शिंदवड गावातील अशोक वाघ या शेतकर्याच्या शेताजवळून जाणारी पाईपलाईन फुटली. यात यांच्या शेतात लाखो लिटर पाणी वाया गेले. या शेतकर्याचे टोमॅटो, द्राक्ष बागेत मोठ्या प्रमाणत पाणी वाहिले. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. जलवाहिनीचे काम सुरू असताना रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकून दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) अनेक मुख्य रस्त्यांचे नुकसान झालेले आहे.
तसेच आता दुरुस्तीसाठी रस्त्याच्या खेटून अनेक ठिकाणी मोठे खड्डे खोदून ठेवले आहे. दुरुस्ती होऊनही ते खड्डे अद्यापही बुजवलेले नाही. वडनेर-शिंदवड रस्त्यालगत एअर वाल काढलेले असल्याने अनेक वेळा ते वाल मधन पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडते. त्यामुळे रस्त्याने येणार्या जाणार्या नागरिकांना (Citizen) मनस्ताप होतो.त्या खोदून ठेवलेल्या खड्डे न बुजविल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगतचे खड्डे इतके मोठे आहे मोठा अपघात होण्याचे शक्यता आहे. खेडगाव जवळील खेडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक वाघ या शेतकर्याच्या शेतात पाणी घुसून त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मनमाड नगरपालिका किंवा या योजनेचा ठेकेदार यांनी भरपाई भरपाई द्यावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे. उद्घाटन पूर्वीच ही जलवाहिनी फुटल्याने मनमाड शहरातील नागरिकांना भविष्यात काय होईल? असा प्रश्न पडला आहे. अजून उद्घाटन झाले नाही तरी जलवाहिनी फुटली आहे. आता भविष्यात काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. तरी या सगळ्या दुरुस्त्या लवकरात लवकर करावी, अशी मागणी होत आहे.




