Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान प्रतीक्षा

Nashik News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान प्रतीक्षा

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

तालुक्यात झालेल्या अतीवृष्टीच्या पावसाचा (Heavy Rains) तडाखा खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात बसला होता. ९१४ हेक्टरवरील मका, बाजरी, कापूस पिकांसह कांदा व शेवगाचे अतोनात हानी झाली होती. १ हजार २३५ शेतकऱ्यांचे अतीवृष्टीच्या तडाख्याने पिकांचे नुकसान (Damage) झाले असल्याने या नुकसान भरपाईसाठी १ कोटी २८ लाख ७७ हजार रूपये अनुदानाची मागणी प्रशासनातर्फे करण्यात आली मात्र निवडणुक आचारसंहितेमुळे हे अनुदान मिळू शकले नव्हते. मात्र निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाली असल्याने रखडलेले अनुदान मिळावे अशी मागणी आपगस्त शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे.

- Advertisement -

गतवर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यात दुष्काळाचे (Drought) सावट पसरले होते. खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील पाण्याअभावी जवळपास वाया गेला होता. यावर्षी मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे, नद्या, नाले ओसंडून वाहिले होते. समाधानकारक पाऊस झाल्याने मका, बाजरी, कापूस, कांदा, शेवगा आदी पिकांची पेरणी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसाने तालुक्यात अक्षरशः धूमाकुळ घातला होता.तब्बल सात ते आठ दिवस उघडीप घेत संततधार धरलेल्या या अतीवृष्टीमुळे खरीप पिकांची तसेच फळबागांची अक्षरशः वाताहत झाली होती.

मालेगावसह (Malegaon) दाभाडी, बडनेर, करंजगव्हाण, कौळाणे निं., सौंदाणे व अजंग व जळगाव निं. या महसुल मंडळांमध्ये अतीवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसला. झोडगे, कळवाडी व डोंगराळे मंडळात अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला होता.अनेक भागात तर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला होता. यामुळे कापणीवर असलेल्या मक्यासह शेतात काढून ठेवलेला मका मोठ्या प्रमाणात भिजल्याने त्याचे नुकसान झाले. कांद्याची रोपे संततधार पावसामुळे सडली. बाजरी, कापूस व शेवगा पिकाची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली होती.

३३ टक्क्‌यांवरील नुकसानीच्या प्राथमिक अहवालात एक हजार २१२.६१ हेक्टर क्षेत्रावरील पिके जमीनदोस्त झाली होती. याचा फटका १ हजार ६७५ शेतकऱ्यांना बसला होता. कृषी, महसूल व पंचायत समितीने सादर केलेल्या अंतिम अहवालात १४ गावातील १ हजार २३५ शेतकऱ्यांच्या ९१४.४६ हेक्टर क्षेत्र अतीवृष्टीने बाधीत झाल्याचा अहवाल दिला होता. या बाधीत शेतकऱ्यांना शासन नियमानुसार १ कोटी २८ लाख ७७ हजाराच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. पिकविमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना विम्याचा देखील लाभ मिळणार आहे, अशी माहिती कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

दरम्यान, तालुक्यात सलग तिसऱ्यावर्षी नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये बेमोसमी पावसाने धूमाकुळ घातल्याने ५ हजार ७९८ हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली होती. २०२३ मध्ये दुष्काळाचा फटका पिकांना बसला. तर यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने या आपग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...