Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : नाशिक जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय गायकवाड

Nashik News : नाशिक जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय गायकवाड

ओझे | विलास ढाकणे | Oze

कैलास नाना वाघचौरे (Kailash Nana Waghchaure) राज्य मानद अध्यक्ष ग्रामपंचायत अधिकारी संघटना डी एन ई १३६ व राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ डी एन ई १३२ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था (Nashik District Gram Sevak Cooperative Credit Society) मर्यादित नाशिकच्या चेअरमनपदी दत्तात्रय लहानु गायकवाड हे १८ पैकी १५ मते घेऊन बहुमताने व व्हाईस चेअरमनपदी युवराज निकम यांची बिनविरोध निवड झाली. नाशिक जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक पंचवार्षिक निवडणूक २०२२-२०२७ पार पडली होती. त्यावेळी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून प्रमोद ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली होती. तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली होती.

- Advertisement -

आवर्तन पद्धतीने चेअरमन प्रमोद ठाकरे यांनी राजीनामा (Resignation) दिल्यानंतर शनिवार (दि. १५ मार्च २०२५) रोजी अध्यासी अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक जिल्हा सहकारी संस्था नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली झाली. यावेळी संचालक प्रमोद सिताराम ठाकरे, दत्तात्रय लहानु गायकवाड, राजेंद्र शंकरराव जाधव, नंदकिशोर सुदाम पाटील, जगन्नाथ दगा सोनवणे, योगेश पांडुरंग पगार, जयवंत आनंदा गारे, कैलास बाबुराव बेंनके, अनिल दामोदर कानवडे, पाहुबा आत्माराम पाटील, सुनील केदा पवार, परेश आनंदसिंग जाधव, राहुल नरेंद्र गायकवाड, योगेश अशोक भामरे, युवराज साहेबराव निकम, रूपाली युवराज मैलागिर, वंदना नरेंद्र पाटील असे १८ पैकी १८ संचालक उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्यानंतर निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी दत्तात्रय गायकवाड व योगेश पगार यांचा प्रत्येकी १ अर्ज दाखल झाला. तर व्हाईस चेअरमन पदासाठी युवराज निकम यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र निर्धारित वेळेत दाखल झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी केली असता दत्ता गायकवाड यांना १८ पैकी १५ व योगेश पगार यांना ३ मते मिळाल्याने दत्तात्रय गायकवाड हे चेअरमन म्हणून निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले. तसेच व्हाईस चेअरमन पदाकरिता युवराज निकम बिनविरोध (Unopposed) निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले.

दरम्यान, या निवडीनंतर उपस्थित सर्व संचालकांनी आणि नाशिक जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा गुलाल उधळून व छोटे खाणी मिरवणूक काढून सत्कार केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश सानप यांनी काम पाहिले. तर पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील शिरसाट यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...