Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमधील वादग्रस्त प्रवेश फी रद्द; भाविकांना दिलासा

Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमधील वादग्रस्त प्रवेश फी रद्द; भाविकांना दिलासा

उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर शहरात (Trimbakeshwar City) येणाऱ्या भाविकांकडून (Devotees) घेतली जाणारी प्रवेश फी तात्काळ रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. देशभरातून लाखो भाविक भगवान त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यातील या पवित्रस्थळी येतात.

- Advertisement -

काही वर्षांपासून वाहनांकडून प्रवेश फी (Entry Fee) आकारली जात होती आणि यासाठी निविदेद्वारे ठेकेदार नेमण्यात आला होता. मात्र, या कर्मचाऱ्यांकडून भाविकांशी अरेरावी व गुंडगिरीच्या तक्रारी वाढत होत्या, इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी पत्रकारांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले. या घटनांमुळे भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्र्यंबकेश्वर नाशिकची प्रतिमा मलीन झाली. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी गंभीर दखल घेत प्रवेश फी रद्द करण्याचे आदेश दिले.

YouTube video player

नगरपालिकेला (Nagar Palika) या माध्यमातून मिळणारा वार्षिक १ कोटी ८ लाख निधी नगरविकास विभागामार्फत प्रतिपूर्ती करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. मुख्याधिकारी त्र्यंबकेश्वर यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या संदर्भात मंत्री दादा भुसे यांनी देखील आग्रही भूमिका घेत पाठपुरावा केला होता.

दरम्यान, नाशिक शहरातील (Nashik City) नागरिकांना दिलासा देण्यासाठी खड्डेमुक्त करण्याच्या मोठ्या मोहिमेला प्रारंभ होणार असून, रस्ते सुरळीत व सुरक्षित बनविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या सर्व निर्णयांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिडकोतील जागा फ्री होल्ड

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिककरांसाठी अनेक विकासात्मक निर्णय जाहीर केले. सिडको परिसरातील जागा फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांना मालकीहक्क मिळणार आहे. तसेच समाजमंदिर, वाचनालय, व्यायामशाळा व सामाजिक सभागृहही नगरपालिका नाममात्र दराने सार्वजनिक सेवाभावी संस्थांना उपलब्ध करून देणार आहे, ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल.

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...