Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News: हातगाडीच्या पत्र्यामुळे गळा चिरलेल्या दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; मृत्यूशी झुंज ठरली...

Nashik News: हातगाडीच्या पत्र्यामुळे गळा चिरलेल्या दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

नाशिक | प्रतिनिधी
वेगावरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यालगतच्या पाणीपुरी विक्रीच्या हातगाड्यास धडकल्यानंतर त्याचा पत्रा गळ्यास चिरुन दुखापत झालेल्या दहावीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वेदांत विशाल गुरसळकर (रा. वज्रभूमी रो हाऊस नं-७, एमएसईबी सबस्टेशनजवळ, वडाळा-पाथर्डी रोड, नाशिक) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस वेदांतच्या पालकांसह प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाच नोंदवून पुढील कायदेशिर कार्यवाही करणार आहेत.

वेदांत हा (दि. २१) सायंकाळी साडेपाच वाजता वडाळा- पाथर्डी रोडवरील नरहरी लॉन्सजवळून पाथर्डी फाट्याकडून इंदिरानगरकडे दुचाकीवरुन जात होता. त्याचवेळी अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने किंवा काहीतरी तांत्रिक अडचण आल्याने त्याची भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाणीपुरी विक्रीच्या हातगाड्यावर जाऊन आदळली. या अपघातात हातगाडीचा पत्रा त्याच्या गळ्यास चिरुन गेल्याने त्याला जबर दुखापत झाली. घटनास्थळी अतिरक्तस्राव झाल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्याला आजी ललीता व इतर नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्याच्यावर शर्थीचे उपचार सुरु असतानाच (दि. २३) सकाळी सव्वा सात वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार किशोर देवरे करत आहेत. वेदांतकडे वाहन चालविण्याचा पक्का परवाना नसताना यासह अल्पवयीन असून सुसाट दुचाकी चालविल्याने त्याचा अपघात झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पालकांच्या बेपर्वाईमुळे ही घटना घडल्याचे समजते, इतर पालकांनी या घटनेतून सजग होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल होणार
मृत वेदांत हा दहावी इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असून ते वाहक आहेत. दरम्यान, वेदांत अल्पवयीन असतानाही नियमांचे उल्लघन करुन दुचाकी चालविली. मोटार वाहन कायद्यान्वये हा गंभीर गुन्हा आहे त्यानुसार, अल्पवयीन मुलास वाहनाची चावी देणे हा देखील गुन्हा असून आता या प्रकरणात इंदिरानगर पोलीस आकस्मिक मृत्यूची नोंद व जाबजबाबानंतर पुढील कार्यवाही करणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...