Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : वाहनाच्या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू

Nashik News : वाहनाच्या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

श्रीरामनगर परिसरात अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करणारा हरणाचा (Deer) सकाळच्या सुमारास नांदगाव-मनमाड रस्ता (Nandgaon-Manmad Road) ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू (Death) झाला. या परिसरात रानडुकरे, हरिण, काळवीट आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर वावर असतो. ते अन्नपाण्याच्या शोधात नेहमी भटकंती करीत असतात आणि याच भागातून नांदगाव-मनमाड रस्त्यावर वाहने भरधाव वेगात धावत असतात. या परिसरात हरणांचा मोठा कळप नेहमी अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करीत असतो. वन्यप्राणी शिकारीच्या मागे पळत असताना वाहनांची धडक लागून जखमी होत असलेल्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.

- Advertisement -

श्रीरामनगर परिसरात (Sriramnagar Area) हरणांचा कळप जात भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने सकाळी साडेसात वाजता हरणाला जोरदार धडक दिल्याने सुमारे ५० फूट लांब जाऊन हरीण जागीच प्राण गत झाले. मात्र सदर पिकअप वाहन चालक न थांबताच तेथून पसार झाला. काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो भेटला नाही. स्थानिक नागरिकांनी वनविभागाला प्रत्यक्ष जाऊन घटनेची खबर दिली. त्यानंतर नांदगाव वनविभागाच्या (Nandgaon Forest Department) कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत झालेल्या हरणाला ताब्यात घेतले असून दफनविधी करण्यात आला.

YouTube video player

दरम्यान, वन्यप्राणी, विशेषतः हरणे, चारा आणि पाण्याच्या शोधात त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून रस्त्यांवर येतात, ज्यामुळे त्यांच्या अपघाती मृत्यूची (Accidental Death) शक्यता वाढते. वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी (Citizens) एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...