Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik News : देशदूततर्फे ‘सुट्टीचे पान’ उपक्रम; विद्यार्थ्यांना हजारोंंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

Nashik News : देशदूततर्फे ‘सुट्टीचे पान’ उपक्रम; विद्यार्थ्यांना हजारोंंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’ तर्फे (Deshdoot) ’सुट्टीचे पान’ (Holiday Page) हा विशेष कूपन चिकटवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वाचकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये एलइडी टीव्ही, एअर कुलर आणि मिक्सर ग्राइंडर यांसारख्या मौल्यवान वस्तूंची लयलूट होणार आहे.

- Advertisement -

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वाचकांना दैनिक ‘देशदूत’मध्ये दररोज प्रसिद्ध होणारे कूपन कापून ते एका वहीत नीट चिकटवून चिकटवही तयार करायची आहे. हा उपक्रम ५ मे २०२६ ते २५ जून २०२६ या ५० दिवसांच्या कालावधीत राबवला जाणार आहे. स्पर्धकांनी या ५० पैकी किमान ४५ कूपन्स चिकटवणे अनिवार्य आहे. स्पर्धकांनी आपली पूर्ण माहिती, नाव, मोबाईल क्रमांक आणि स्वतःचे रंगीत छायाचित्र चिकटवहीवर लावून ती ३० जून २०२६ पर्यंत आपल्या जवळच्या देशदूत कार्यालयात (Deshdoot Office) किंवा वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करणे आवश्यक आहे.

दरम्यान, या उपक्रमाचा निकाल (Result) पारदर्शक पद्धतीने सोडत (लकी ड्रॉ) काढून जाहीर केला जाईल आणि या प्रक्रियेत देशदूत व्यवस्थापनाचा (Deshdoot Management) निर्णय अंतिम राहील. उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी वाचकांनी प्रशांत आहिरे, सोमनाथ गडाख, वसंत भोईर किंवा विलास झगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


बक्षिसांची लयलूट

प्रथम बक्षीस 1 एलइडी टीव्ही, द्वितीय बक्षीस २ कुलर, तृतीय बक्षीस ४ मिक्सर ग्राइंडर, चतुर्थ बक्षीस ५ क्रिकेट किट, पाचवे बक्षीस ५० अप्पम मेकर आणि सहावे बक्षीस म्हणून १०० जणांना गिफ्ट हॅम्पर दिले जाणार आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Darshan Scam : मुक्काम कारागृहातच! कडलगांना सातव्या सुनावणीनंतरही दिलासा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांना व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आणि मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम...