Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : 'देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो' उद्यापासून; गृहस्वप्नपूर्तीची नाशिककरांना मोठी संधी

Nashik News : ‘देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’ उद्यापासून; गृहस्वप्नपूर्तीची नाशिककरांना मोठी संधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दै. ‘देशदूत’तर्फे (Deshdoot) शुक्रवार दि. ९ ते ११ जानेवारी दरम्यान ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे (Deshdoot Nashik Road Property Expo) आयोजन करण्यात आले आहे. या एक्पोचे मुख्य प्रायोजक ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत. उद्या (दि.९) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रुचिका महिला मंडळाच्या विश्वस्त सीमा कलंत्री, सुरेहा सोमाणी, अध्यक्षा अरुणा कलंत्री, उपाध्यक्षा निकिता मंत्री, तसेच सदस्य श्वेता कलंत्री, हेमा बूब, मनीषा भारडीया, शांता राठी, शारदा केला, भारती कासट, इंदू जाजू, सुनंदा मालपाणी, रंजना चांडक, पद्मा भुतडा, नेहा झंवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’च्या माध्यमातून सामान्यांचे गृहस्वप्न (House) साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे. नाशिकरोड, जेलरोड येथील मनपा आरक्षित नियोजित नाट्यगृह जागेच्या मोकळ्या भूखंडावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांना येथे खुला प्रवेश असेल. पाहिले घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी तसेच सध्या घर असलेल्या परंतु, नव्या घराच्या शोधात असलेल्यांसाठी या प्रदर्शनात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

YouTube video player

नाशिकरोड (Nashik Road) शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी, निमसरकारी आस्थापना, शाळा, महाविद्यालय, न्यायालय, टोलेजंग मॉल्स, मुख्य बाजारपेठ, शेतीप्रधान परिसर आणि माळेगाव, शिंदे, सिन्नर औद्योगिक वसाहतींना कनेक्ट असणारा नाशिक-पुणे महामार्ग यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याशिवाय वेगवान रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेमुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. भविष्याचा विचार करता रिअल इस्टेट क्षेत्रात नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे.

घर असो वा दुकान सर्व गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना (Citizen) एकाच छताखाली येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे पर्यावरणीय पार्टनर म्हणून पपयाज नर्सरी यांचे सहकार्य लाभले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन आपल्या गृहस्वप्नपूर्ती कडे पाऊल टाकावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सहभागी बिल्डर्स

ए.सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आदित्य डेव्हलपर्स, शहाणे इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिल्पा इस्टेट, अनुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ऋषी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री बिल्डकॉन अँड असोसिएट, एव्हीआय कन्स्ट्रक्शन, अमृत लाईफ स्पेसेस, विश्वकर्मा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, देसले पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रॉनी इलेव्हेटर्स प्रा. लि., सीडीआयएल

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...