Friday, February 6, 2026
HomeनाशिकNashik News : 'मौनी अमावस्या'निमित्त रामकुंडावर दिवसभर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Nashik News : ‘मौनी अमावस्या’निमित्त रामकुंडावर दिवसभर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय संस्कृतीत मौनी अमावस्येला (Mauni Amavasya) गंगेत स्नान करुन दान धर्माला विशेष महत्त्व असल्याने आज दिवसभर रामकुंडावर (Ramkund) स्नान (Bathing) करुन गोरगरिबांना अन्न धान्य दान देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

- Advertisement -

त्यामुळे मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंडाकडे जाणारी वाहतुक (Transportation) बंद करण्यात आली होती. हा दिवस प्रयागराजमधील महाकुंभ पर्वणीचा असल्याने पुण्य प्राप्तीचा,पवित्र स्नानाचा आणि दान करण्याचा दिवस मानला गेला. रामकुंडावर मुंबई, कर्नाटक तसेच नाशिक शहर परिसरातील (Nashik City Area) भाविकांनी पहाटेपासूनच स्रानासाठी गर्दी केली होती.

YouTube video player

दरम्यान, रामकुंडापासून दुतोंड्या मारुतीपर्यंत गोदावरी नदीच्या दोन्ही काठावर भाविकांच्या (Devotees) गर्दी कुंभपर्वातील स्रानाची आठवण करून देत होती. यामुळे जणू रामकुंडाला मीनी कुंभ स्नानाच्या पर्वणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी रामकुंड,गांधीतलाव, दुतोंड्या मारुती कुंडापर्यंत भाविक घाटावर बसून डुबकी मारतांना दिसले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...