Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : मकर संक्रांतीनिमित्त रामकुंडावर भाविकांची गर्दी; गोदातीरी मिनी कुंभमेळ्याचे दर्शन

Nashik News : मकर संक्रांतीनिमित्त रामकुंडावर भाविकांची गर्दी; गोदातीरी मिनी कुंभमेळ्याचे दर्शन

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा सण (Festival) दरवर्षी पौष महिन्यात साजरा केला जातो. आज १४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांती साजरी केली जात आहे. मकर संक्रांतीचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक देखील आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात.हिंदू धर्मात हा दिवस पुण्य प्राप्तीचा,पवित्र स्नानाचा आणि दान करण्याचा दिवस मानला जातो.

- Advertisement -

संपूर्ण भारतात (India) मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे.सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो. हिंदू धर्मात हा एक पुण्यपूर्ण दिवस मानला जातो.मकर संक्राती ही जीवनात सुख,समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक मानली जाते.या दिवशी तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे.तीळ आणि गुळाचे या सणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. यावर्षी मकर संक्रांती १४ जानेवारी रोजी साजरी केली जाते. सूर्योदयानंतर सकाळी ०९.०३ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.या दिवसाचा शुभ मुहूर्त सकाळी ०८.४० ते दुपारी १२. ३० पर्यंत आहे, यावेळात गंगाजलाने पवित्र स्नान करणे आणि दान देणे यांचे महत्त्व आहे. याशिवाय महापुण्यकाळ मुहूर्त ०८:४० ते ०९:०४ पर्यंत होता. या काळात भाविकांनी सूर्यदेवाला विशेष प्रार्थना आणि अर्घ्य अर्पण करून पुण्य प्राप्त करता येते.

मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत भाविकांनी (Devotees) गोदावरीवर स्रानासाठी गर्दी केली होती.सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणाऱ्या मुहूर्तावर गोदास्रान करण्याला प्राधान्य दिले जाते. हा मुहूर्त साधत मुंबई,कर्नाटक तसेच नाशिक शहर परिसरातील भाविकांनी गोदाकाठी पहाटे पासूनच स्रानासाठी गर्दी केली होती. रामकुंडापासून दुतोंड्या मारुतीपर्यंत नदीच्या दोन्ही काठावर भाविकांच्या गर्दीने कुंभपर्वातील स्रानाची आठवण करून दिली. वर्षभरातील महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक असलेला मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत बहुसंख्य नागरिकांनी गोदावरीच्या रामकुं डावर स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.यामुळे जणू रामकुंडाला कुंभ स्नानाच्या पर्वणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मकर संक्रांत हा नववर्षामधील पहिला सण असतो.या सणानिमित्त नदीपात्रावर (River Bed) स्नान करण्याची प्रथा आहे.या प्रथेनिमित्त शहरातील गोदावरीवर स्नान करण्यासाठी महिला,पुरुषांची झुंबड उडाली होती. सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. या तिथीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला शुभ मानले जाते. यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करण्यासाठी नदीवर जमले होते. यामुळे जणू कुंभमेळ्याची पर्वणी आहे की काय असेच चित्र पहावयास मिळाले. सकाळपासून भाविकांची नदीवर गर्दी झाली होती.रामकुंड,गांधीतलाव, दुतोंड्या मारुती कुंडापर्यंत भाविक नदीघाटावर बसून डुबकी मारताना दिसून आले.

गर्दीमुळे उडाला प्रशासनाचा बोजवारा

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मकरसंक्रांतीनिमित्त उत्तरभारतीयानी गर्दी केली होती परंतु अचानक होणारी भाविकांच्या गर्दीने प्रशासनाचा बोजवारा उडतांना दिसला,विस्कळीत वाहतुकीचे नियोजन,पार्किंगची व्यवस्था नाही,स्थानिक पोलीस यंत्रणेची वेळेवर उपस्थितीती नाही अशा कारणांमुळे स्नानासाठी जिल्ह्याभरातुन येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पृथ्वीच्या मकर राशीला सूर्य अनुकूल झाल्यामुळे या थंडीच्या दिवसामध्ये नागरिकांना रोगराईपासून सरंक्षण मिळते. तसेच प्रयागराज याठिकाणी होणाऱ्या महा कुंभमेळयाच्या शुभारंभाचा मुहूर्त आज असल्याने आजचा दिवस महत्वाचा मानला जात आहे. एक कोटी भाविक कुंभमेळ्यात यादिवशी स्नान करून मनाची शुद्धी करणार आहेत.

रवींद्र प्रभाकर देव, नाशिक पुरोहित संघ,नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...