Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde : "ते रामकुंडावर आले अन्..."; धनंजय मुंडेंचा दुसरा नाशिक...

Dhananjay Munde : “ते रामकुंडावर आले अन्…”; धनंजय मुंडेंचा दुसरा नाशिक दौरा चर्चेत, नेमकं काय घडलं?

नाशिक | Nashik 

राज्याचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे अडचणीत आले होते. या प्रकरणामुळे त्यांना मंत्रीपदाचाही राजीनामाही द्यावा लागला होता. दुसरीकडे त्याचवेळी करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma-Munde) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यातच मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराने ग्रासले होते. यानंतर ते काहीसे राजकारणापासून दूर झाले होते.

- Advertisement -

धनंजय मुंडे पक्षासह इतर कार्यक्रमांना गैरहजेर राहत होते. त्यामुळे त्यांची ही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत होती. यानंतर त्यांनी थेट जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) येथील विपश्यना केंद्र गाठत दहा दिवस मौन धारण केले. त्यानंतर ते पुन्हा एकदा बीडकडे रवाना झाले होते. मात्र, यानंतर आज (बुधवार) सकाळी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे हे एका धार्मिक विधीसाठी नाशिकच्या रामकुंडावर आल्याचे दिसून आले.

धनंजय मुंडे हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी रामकुंडावर (Ramkund) आले होते. यानंतर रामकुंडाववरील वस्त्रांतर गृहात धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी हाताने ओठांवर बोट फिरवून मौन असल्याचा संदेश आपल्या देहबोलीतून दिला. दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा हा नाशिक दौरा (Nashik Visit) राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे बघायला मिळाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...