ननाशी/वार्ताहर Nanashi
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रडतोंडी (Radtondi) येथे दरड कोसळल्याची (Landslide) घटना घडली. या घटनेत १० ते १५ घराचे नुकसान झाल्याची बातमी संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरले. (Viral in Social Media) प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे, मदतकार्य सुरु आहे अशा काही वार्ताही समाजमाध्यमांत मीठ मिरची लावून व्हायरल झाल्या होत्या….
मात्र, दुपारी दोन वाजेनंतर या घटनेची खरी उकल झाली असून सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांत पावसाने जे थैमान घातले आहे. अनेक गावांवर दरडी कोसळून (Land Slide) अनेक बळी यात गेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन (Nashik District Administration) आपत्ती विभागाकडून (Disaster Management) करण्यात आलेले ते मॉकड्रील असल्याचे समोर आले. (mock drill)
अधिक माहिती अशी की, सकाळी दरड कोसळल्याची घटना शासकीय यंत्रणेला मिळताच सर्वात आधी ननाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकीय अधिकारी श्रीमती भोये व ननाशीचे ग्रामविकास अधिकारी श्री गावित हे घटनास्थळी पोहचले.
त्यानंतर काही वेळात दिंडोरी पेठचे प्रांत अधिकारी डॉ. संदिप आहेर तसेच तहसिलदार पंकज पवार यांच्यासह महसूल यंत्रणा घटनास्थळी पोहचली.
ही घटना वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे वनविभाग आपल्या सर्व ताफ्यासह हजर झाला. त्याचप्रमाणे पोलिस बांधकाम यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणा एक तासाच्या आत घटनास्थळी हजर झाली होती. प्रत्यक्ष मात्र शासकीय यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन हे रंगीत तालीम घेत असल्याचे निदर्शनास आले व तालुक्यातील जनतेने सुटकेचा श्वास सोडला.