Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : बडतर्फ लष्करी जवान चंदू चव्हाणचा 'धिंगाणा'; अटकेनंतर देवळाली कॅम्प...

Nashik News : बडतर्फ लष्करी जवान चंदू चव्हाणचा ‘धिंगाणा’; अटकेनंतर देवळाली कॅम्प पोलिसांना धरले वेठीस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय लष्कराविरोधात (Indian Army) बंड करून अपप्रेरणा देण्यासह लष्करी जवानांना कर्तव्यापासून किंवा निष्ठेपासून विचलित करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील बडतर्फ लष्करी जवान संशयित चंदू बाबूलाल चव्हाण (रा. मोहाडी, धुळे) याला देवळाली कॅम्प पोलिसांनी (Deolali Camp Police) दाखल गुन्ह्यात अखेर गुरुवारी रात्री अटक केली. अटकेनंतर त्याला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणले जात असताना त्याने अटकेस विरोध करून प्रचंड गदारोळ घातला.

- Advertisement -

त्यानंतर शुक्रवारी (दि. ११) सकाळी नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik District Court) हजर करण्यात आले असता त्याने येथेही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याला न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली सुनावली आहे. आहे सन २०१६ मध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ वेळी भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेला व पुन्हा भारतात परतल्यावर ‘कोर्ट मार्शल’ नंतर लष्करातून बडतर्फ झालेला वादग्रस्त जवान चंदू चव्हाण याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

YouTube video player

गुरुवारी (दि.१२) सायंकाळी एका तक्रारीसाठी मोहाडी पोलीस ठाण्यात (Mohadi Police Station) जात तिथेही ‘लाईव्ह’ करून गोंधळ घालणाऱ्या चव्हाणच्या मागावर असलेल्या देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला रात्री अकरा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथेही त्याने ‘मला अटक का केली, माझा गुन्हा काय, माझे म्हणणे मांडू द्या’ या स्वरुपाचे दावे करत गोंधळ घातला.

दरम्यान, त्याने वारंवार गंभीर कसुरी व कृत्य केले असून, आर्मी ॲक्ट १९५० च्या तरतुदीचे पालन करून त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. त्याला बाजू मांडण्याची पूर्ण मुभा दिली. या ॲक्टनुसार, सैनिकाला (Jawan) त्याच्या कर्तव्याचा भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सहाय्यक म्हणून कार्यालयीन वैयक्तिक कामे करावे लागतात. युद्धजन्य परिस्थिती नसताना गवत कापणे, झाड लावणे, परिसरात रंगरंगोटी करणे, वाहनांची दुरुस्ती ही कामे करावी लागतात. त्यामुळे त्याच्या आरोपात तथ्यांश नसल्याचे आर्मीने म्हटले आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख व पथक करत आहे.

असे आहे प्रकरण

चंदू याने सैन्याविरोधात यूट्यूब व इतर माध्यमांतून बिनबुडाची टीका केल्याचे भारतीय सैन्याच्या नजरेस पडल्याने मे २०२५ मध्ये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चंदूविरोधात विविध गंभीर कलमान्वये फिर्याद दाखल केली होती. विशेष म्हणजे त्याने सातत्याने सैन्यदलासह सरकारविरुद्ध आंदोलन, आत्मदहन, भीक मांगो आंदोलन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आर्टिलरी सेंटरमधील सचिन गंगाधर गुंजाळ (३८, रा. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार २६ एप्रिल २०२४ ते ३० मे २०२५ या कालावधीत चंदूने यूट्यूब चॅनलवर भारतीय सैन्याविषयी चुकीची माहिती दिली. त्यान्वये गुंजाळ यांना वरिष्ठांनी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. तेव्हा सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुंजाळ यांना दिलेल्या सीडीतील काही व्हिडिओ त्यांनी बघितले. त्यामध्ये खोट्या माहितीवर आधारित व्हिडिओ चव्हाणने बनवले असून, सैन्य दलात बंड घडवण्याचा त्याचा उद्देश दिसतो. जवानांना विचलित करून वरिष्ठांवर हल्ला करण्यासह नोकरी सोडण्यासाठी चिथावणी देण्याचा उद्देश दिसतो. बडतर्फ असतानाही शासकीय गणवेशाचा वापर चव्हाणने केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...