नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (Nationalist Congress Party) जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विधानसभा, तालुका, शहर तसेच विविध सेलच्या अध्यक्षांची महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय आढावा बैठक सोमवारी (दि. ७) आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे (Dilip Khaire) यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.
जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी बैठकीत (Meeting) विविध संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. आगामी काळातील पक्षाची भूमिका, संघटन विस्तार तसेच तळागाळापर्यंत पक्षाची ताकद वाढविण्यासंदर्भातही यावेळी आढावा घेतला जाणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, दिलीप बनकर आणि नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच विविध सेलचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. संबंधित पदाधिकाऱ्यांनी बैठकीस वेळेत व अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केले आहे.




