Friday, July 24, 2026
HomeनाशिकNashik News : अडीच वर्षाच्या दिव्यांशीचा राष्ट्रीय विक्रम; 'इंडिया बुक ऑफ...

Nashik News : अडीच वर्षाच्या दिव्यांशीचा राष्ट्रीय विक्रम; ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर (Satpur) येथील रहिवासी दिव्यांशी दिनकर वाघ (Divyanshi Wagh) हिने असमान्य कर्तृत्व गाजवले आहे. अवघ्या २ वर्षे ५ महिन्यांच्या (Months) लहानग्या वयात असामान्य स्मरणशक्ती, झपाट्याने आठवण ठेवण्याची क्षमता आणि तेजस्वी शिकण्याच्या गुणांमुळे दिव्यांशीने सर्वांना आश्चर्यचकित करत राष्ट्रीय पातळीवर आपला पहिला विक्रम प्रस्थापित केला आहे.

- Advertisement -

दिव्यांशीची नोंद प्रतिष्ठित ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये (India Book of Records) होऊन तिला ‘यंग अचिव्हर’ म्हणून गौरविण्यात आले आहे. या कोवळ्या वयात तिने आत्मविश्वासाने संस्कृत श्लोक व नर्सरी रायम्स म्हणून दाखवल्या. फळे, वाहनं, प्राणी व शरीराचे अवयव ओळखून नावे सांगितली. इंग्रजी अल्फाबेट्स, १ ते १० संख्या सहजतेने म्हटल्या आणि प्राण्यांचे (Animals) आवाज अचूकपणे नकलून दाखवले.

दरम्यान, तिची आई (Mother) योगिता यांनी सांगितले की, मुलीची (Girl) जिज्ञासा, नियमित सराव आणि शिकण्याची ओढ यामुळे हे यश शक्य झाले. राष्ट्रीय पातळीवर तिचा गौरव झाल्याने आम्हाला अभिमान वाटतो. तिचे हे असामान्य कर्तृत्व व बुद्धिमत्ता परिसरात अभिमानाचे कारण ठरले असून, समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

ताज्या बातम्या

Rahuri : राहुरी येथे अंगणवाडी भरतीत ‘लाखांच्या व्यवहाराची’ चर्चा

0
उंबरे |वार्ताहर| Umbare राहुरी तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांकडून भरती करून देण्याच्या नावाखाली एक लाख रुपयांची मागणी होत असल्याची...