वावी | वार्ताहर | Vavi
तालुक्यातील मलढोण येथे अचानक शिक्षकाची बदली केल्याने येथील संतप्त ग्रामस्थांनी जि. प.शाळेला कुलूप लावल्याची घटना दि. 9 रोजी दुपारी घडली.
गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. मलढोण गावात विद्यार्थ्यांची पटसंख्या 92 च्या पुढील असून त्या ठिकाणी चार शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र येथील एका शिक्षकाची बदली माळेगाव एमआयडीसी येथे करण्यात आली.
Nashik Crime News : कोचरगावात खून का बदला खून
ही बाब सरपंच शिवाजी हालवर यांना समजताच त्यांनी तात्काळ येथील केंद्रप्रमुख खेडकर यांच्याशी संपर्क साधून शिक्षकाची बदली कुठलीही माहिती न देता का केली व कशी केली? याबाबत चौकशी केली. त्यावर केंद्रप्रमुख यांनी चौथा शिक्षक देणे शक्य होत नसल्याचे स्पष्ट केले. येथील विद्यार्थ्यांना एक शिक्षक कमी झाल्याने एकाच वर्गात 50 विद्यार्थी बसविण्याची वेळ आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेत शाळेला कुलूप ठोकले.
Nashik Crime News : कोचरगावात खून का बदला खून
गटशिक्षणाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन आमच्याशी चर्चा करावी, अशी मागणी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुरेश पवार येथील सरपंच शिवाजी हालवर, तानाजी बोंबले, गोरख पावले, दत्तू सरोदे, संतोष पावले, विजय बोंबले,ओंकार इले, विनोद मिस्कर, शिवाजी सरोदे, दिलीप बोंबले सचिन हालवर, अण्णा गेठे, दादू इले आदींसह अनेक ग्रामस्थांनी केली. जोपर्यंत गटशिक्षणाधिकारी गावात येत नाही तोपर्यंत शाळा उघडणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन