Thursday, June 11, 2026
HomeनाशिकNashik News : बेशिस्तीला बसणार लगाम; चाळीस सिग्नलवर CCTV कार्यरत, नियमभंग थेट...

Nashik News : बेशिस्तीला बसणार लगाम; चाळीस सिग्नलवर CCTV कार्यरत, नियमभंग थेट कॅमेऱ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील वाहतुकीच्या (City Trafic) बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी शुक्रवार (दि. २०) पासून पोलीस आयुक्तालयाने कठोर पाऊले उचलली आहेत. बहुप्रतीक्षित असलेले ४० प्रमुख सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले असून, त्यासोबत ई-चलन प्रणालीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे, ट्रिपल सीट, यू-टर्नचे उल्लंघन आदी प्रकार थेट कॅमेऱ्यात कैद होऊन वाहनचालकांना घरपोच दंडाचा संदेश मिळणार आहे.

- Advertisement -

शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाढती वाहतूक आणि होणारे अपघात लक्षात घेऊन ही आधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. आतापर्यंत मनुष्यबळावर अवलंबून असलेली कारवाई आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी होणार आहे. सिग्नल परिसरात बसवलेले हाय रिझोल्युशन कॅमेरे २४ तास नजर ठेवणार असून नियमभंगाचे फोटो व व्हिडिओ पुरावे तत्काळ नियंत्रण कक्षात पाठवले जातील. त्यानंतर संबंधित वाहन क्रमांकावर ई- चालन जारी केले जाईल. सिग्नल जम्प, झेब्रा क्रॉसिंग, ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट / सीट बेल्टचा अभाव, यू-टर्न, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे आदींच्या उल्लंघनावर आता थेट डिजिटल पुराव्यासह कारवाई होणार आहे. त्यामुळे “पोलीस नाहीत” या समजुतीवर नियम मोडणाऱ्यांना चाप बसणार आहे.

दरम्यान, शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या चौकांवर ही प्रणाली सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ४० सिग्नलवर सीसीटीव्ही कार्यान्वित झाले असून पुढील काळात आणखी ठिकाणी विस्तार होणार असल्याचे संकेत आहेत. नियंत्रण कक्षातून संपूर्ण यंत्रणेवर देखरेख ठेवली जाणार आहे.

बेशिस्त येथून होतील नजरकैद

सरकारवाडा पोलिस स्टेशन, सीबीएस, मेहेर सिग्नल, जुना गंगापूर नाका, शरणपूर चौकी, तरण तलाव, सांगली बँक, त्र्यंबक नाका, कॅनडा कॉर्नर, गंगापूर पोलीस स्टेशन, एबीबी सर्कल, सिबल हॉटेल, जेहान सर्कल, सिटी सेंटर मॉल, बारदान फाटा, पाइपलाइन रोड, प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कल, भद्रकाली पोलीस स्टेशन, खडकाळी, मुंबई नाका पोलीस स्टेशन, गडकरी चौक, नागजी चौक, मुंबई नाका सर्कल, पंचवटी पोलीस स्टेशन, पेठ नाका, काट्या मारुती चौक, सेवा कुंज, मखमलाबाद नाका, ड्रीम कॅसल नाका, तारवालानगर चौफुली, नवीन मार्केट चौक, म्हसरूळ पोलिस स्टेशन, मेरी चौफुली, राऊ हॉटेल, आडगाव पोलीस स्टेशन, नांदूर नाका, मिरची सिग्नल (कैलासनगर), सातपूर पोलीस स्टेशन, आयटीआय चौक, पपया नर्सरी, समृद्धी टी पॉइंट, महिंद्रा सर्कल, अंबड पोलीस स्टेशन, त्रिमूर्ती चौक, नाशिक रोड पोलीस स्टेशन, विहीतगाव टी पॉइंट, बिटको चौक, सिन्नर फाटा, उपनगर पोलीस स्टेशन, दत्तमंदिर

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...