Saturday, April 26, 2025
Homeक्राईमNashik News : मनपा सेवक, एजंटाच्या घरावर ईडीचे छापे; बनावट जन्मदाखल्याप्रकरणी कारवाई

Nashik News : मनपा सेवक, एजंटाच्या घरावर ईडीचे छापे; बनावट जन्मदाखल्याप्रकरणी कारवाई

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदात्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Case) आज ईडीच्या (ED) पथकाने शहरात महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागात कार्यरत व सध्या तुरुंगात असलेल्या दोघा कर्मचाऱ्यांसह एका एजंटाच्या घरावर छापे (Raid) टाकत सखोल चौकशी केली सुमारे चार ते पाच तास घरांच्या झाडाझडतीसह चौकशी केली गेली. या कारवाईत एका घरात जन्म दाखले मिळून आल्याने पथकाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करत ते जप्त केले या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शहरात मनपा व तहसील कार्यालयातून बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदपत्रांच्या (Fake Document) आधारे जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनातर्फे विशेष तपास पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे तर छावणी पोलीस ठाण्यात यासंदर्भात १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात येऊन वकील, मनपा कर्मचारी एजंटासह अनेकांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

बनावट जन्म दाखला प्रकरणी काल इडीच्या पथकांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागातील कर्मचारी व सध्या नाशिक रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शेख अब्दुल तथ्याब शेख रज्जाक याच्या रोनकाबाद गल्ली नंबर ७ मध्ये असलेल्या घरावर सशत्र पोलीस बंदोबस्तात छापा टाकत घराची झाडाझडती घेतली तब्बल चार ते पाच तास सुरू असलेल्या या चौकशी मोहिमेत ईडी अधिकाऱ्यांना घरात जन्म दाखले मिळून आल्याने ते पंचनामा करीत जाम करण्यात आले. दुपारी चार वाजेनंतर ईडीचे पथक या घरातून बाहेर पडले या कारवाई संदर्भात माहिती देण्यास पथकातील अधिका-यांनी पत्रकारांना नकार दिला.

दरम्यान, ईडी पथकाने महानगरपालिकेत जन्म मृत्यू विभागातील कार्यरत कर्मचारी व सध्या गुन्ह्यात तुरुंगात (Jail) असलेल्या गजाला परवीन तिच्या घरावर देखील छापा मारून घराची झाडाझडती घेतली तसेच एजंट मोहम्मद अमीन याच्या दरेगाव शिवारातील अहमद रजा इदगा लगत असलेल्या घरावर इडीपथकाने छापा टाकून घराची झाडाझडती घेतली या कारवाईत पथकाच्या हाती काय लागले याची माहिती मिळू शकली नाही.

अपयश लपविण्यासाठी छापेमारी आसिफ शेख

बनावट जन्म दाखले घेऊन शहरात बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर वास्तव्य करीत असल्याचा आरोप भाजप नेत्यातर्फे केला गेला, बनावट जन्म दाखल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तीन महिने उलटले तरी पोलीस व तपास यंत्रणेस शहरात एकही बांगलादेशी घूसखोर सापडलेला नाही तपासाचे अपयश लपवण्यासाठीच ईडी पथकातर्फे आज शहरात छापेमारी करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकारांशी बोलताना केला. रौनकाबाद भागात मनपा कर्मचारी शेख अब्दुल तवाब यांच्या घरावर इडी पथकाने छापा मारल्याची माहिती मिळतात माजी आमदार आसिफ शेख यांनी घटनास्थळी भेट देत छापा टाकण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची चर्चा केली जन्ममृत्यू दाखल्या संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ही तपासणी केली जात असल्याचे पथकातर्फे सांगण्यात आल्यावर आसिफ शेख यांनी अब्दुल तवाब याच्या कुटुंबीयांना पथकाच्या अधिकायांना चौकशीसाठी सहकार्य करण्याची सूचना केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार असिफ शेख यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मालेगाव शहराला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे शरद बांगलादेशी रोहिंग्या घसूखोर वास्तव्य करीत असल्याचा आरोप केल्या जात आहे मात्र पोलीस व विशेष तपास पथकास अद्याप पर्यंत एकही बांगलादेशी शहरात मिळून आलेला नाही असे असले तरी निरपराध नागरिकांना त्रास दिला जात आहे या संदर्भात कायदेशीर लढा अल्पसंख्याक सुरक्षा समिती देत राहणार असल्याचे आसिफ शेख यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या