Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : सिंहस्थासाठी ऐंशी लाख भाविक येण्याचा अंदाज

Nashik News : सिंहस्थासाठी ऐंशी लाख भाविक येण्याचा अंदाज

नाशकात तीन टप्प्यांत पोलीस बंदोबस्ताची आखणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी सिंहस्थाकरिता (Simhastha Kumbh Mela) पोलिसांनी (Police) वाहतूक नियोजनालाही सुरूवात केली आहे. आयुक्तालयात कार्यान्वित झालेल्या सिंहस्थ कक्षात ‘प्रभारी’ अधिकारी नेमून तीन टप्प्यांत बंदोबस्ताची आखणी करण्यासह सिंहस्थाच्या विस्तृत नियोजनाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामध्ये २०२६-२७ मध्ये होणाऱ्या नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीतील सिंहस्थात प्रारंभी ७५ ते ८० लाख भाविक येण्याचा अंदाज असून, त्यानुसार पोलिसिंगचेही नियोजन सुरू झाले आहे. तर, ‘अॅक्शन प्लॅन बी देखील तयार केला जातो आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाने (City Police Commissionerate) कामांना सुरूवात केली आहे.

- Advertisement -

यात प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, बंदोबस्ताची आखणी, बाहनतळे, वाहनांचे मार्ग ठरविण्यासह, वाहतूक नियोजन, रुट गर्दी व्यवस्थापन ‘बहीआयपी चे दौरे व इतर सर्व महत्वाच्या मुद्यांवरील कामकाजाचा आढावा आयुक्तालयातर्फे नियमित घेतला जात आहे. विशेष म्हणजे, शहर पोलिसांनी (City Police) कामांच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. त्यानुसार सिंहस्थ कालावधीत नाशिक शहरातील साडेतीन हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याोसह महाराष्ट्र व परराज्यातून पंचवीस हजार पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ मागविण्यासह इतर आराखड्याचे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातच पैरामिलिटरी, सीआयएसएफ व सीआरपीएफ व अन्य तुकडचा सज्ज ठेवल्या जाणार आहेत. तर नाशिक पोलिसांनी प्रयागराज येथे पाहणी दौरा केला असून, त्यामध्ये सध्या सिंहस्थ कक्षात नेमलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता.

दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी पोलीस पूर्वतयारी समिती स्थापन करून सिंहस्थातील आयुक्तालयाने सिंहस्थाकरीता समिती गठीत केली आहे. त्यानुसार अध्यक्ष संदीप कर्णिक, उपाध्यक्ष उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सदस्य सचिव उपायुक्त मुख्यालय व वाहतूक चंद्रकांत खांडवी, सदस्य उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, गुन्हे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, वाहतूक सहाय्यक आयुक्त एवजा बडे (अतिरिक्त कार्यभार), प्रशासन सहाय्यक आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर क्ड, विशेष शाखेतील सर्व पोलीस निरीक्षकांसह निवृत्त सहाय्यक आयुक्त दिनेश बर्डेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, सिंहस्थात शहरात अपेक्षित चौक्या, बल्ली बॅरिकेडिंग, स्टील बरकेडिंग, सीसीटीव्ही, बावरलेस यंत्रणा, वाँच टॉवर, ड्रोन कॅमेऱ्यांसह सर्व पोलीस ठाण्यांतील संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, झेरॉक्स मशिनसह टेबल-खुच्र्या, कपाटे, पी. ए. पी. एस सिस्टिमची पडताळणी व खरेदीसाठीची यादी तयार करणे सुरु आहे.

काटेकोर नियोजन

बात वर्षांनी भरणारा महकुंभ नुकताच प्रयागराज येथे पार पडला. त्यावेळी देशभरातून व परदेशातून कोट्यवधी भाविकांनी प्रयागराज मध्ये हजेरी लावली. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने यंत्रणांचे नियोजन पूर्णतः कोलमडल्याचा प्रत्यय तेथे आला, तेथे घडलेल्या कुटिनांमध्ये ‘भाविकांना जीवही गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या। सिंहस्थाकरिता यंत्रणा सतर्क आहे कुठलीही दुर्घटना घडूनये, यासाठी काटेकोर नियोजन सुरु आहे .

वाढीव संख्येनुसार नियोजन

सच्या ७५ लाख भाविकांचा अंदाज व्यक्त होत असला, तरी पुढील टप्प्यातील नियोजन, आखाड्यांसोबतच्या बैठका, देशातील धार्मिक वातावरण विचारात घेता भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढीव संख्येनुसार ही ‘बी-अॅक्शन प्लॅन’ यंत्रणा तयार करीत आहे. दरम्यान, पर्वणीचा दिवस, त्यापूर्वी व नंतरचे दिवस आणि नियमित दिवस यानुसार तीन टप्प्यांत बंदोबस्ताची आखणी सुरू झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...