Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : वृद्ध महिलेला भामट्यांचा गंडा; दागिने केले लंपास

Nashik News : वृद्ध महिलेला भामट्यांचा गंडा; दागिने केले लंपास

- Advertisement -

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

‘पोलिस’ असल्याचे भासवून ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन केला आणि ‘पुढे खून झाला आहे’ असा बनाव करत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेत दोन भामट्यांनी हातचलाखीने ते लंपास केले. अश्विननगर परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकारात सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

स्मिता मिस्त्री (वय ६३) या रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अश्विननगर येथील रिक्षा स्टँडजवळून जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. ‘आम्ही पोलिस आहोत, चेकिंग सुरू आहे,’ असे सांगून त्यांनी मिस्त्री यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुढे खून झाल्याचे सांगत, सुरक्षिततेच्या कारणास्तव गळ्यातील सोन्याचे दागिने काढून बॅगेत ठेवण्यास सांगितले.

दोघांच्या बोलण्यामुळे घाबरलेल्या मिस्त्री यांनी गळ्यातील दागिने काढले. याचवेळी संशयितांनी हातचलाखी करून दागिने लंपास केले आणि घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळानंतर दागिने गायब असल्याचे मिस्त्री यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ अंबड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी दोन अनोळखी तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याचे सांगितल्यास तत्काळ विश्वास न ठेवता त्यांची ओळख पडताळून पाहावी आणि संशय आल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद परिसरात एका २१ वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमेश्वर विलास...