Friday, January 23, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : दुगारवाडीत अकरा तरुण पाण्याच्या प्रवाहात फसले; रेस्क्यूमुळे जीवदान

Nashik News : दुगारवाडीत अकरा तरुण पाण्याच्या प्रवाहात फसले; रेस्क्यूमुळे जीवदान

नाशिक | त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Nashik | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) निसर्गाचे नंदनवन असलेल्या नेकलेस फॉल अर्थात दुगारवाडी (Dugarwadi) धबधबा येथे अतिउत्साही पर्यटकांच्या (Tourist) जीवावर बेतण्याजोगी घटना रोखण्यात पोलिसांसह वनविभाग आणि रेस्क्यू पथकाला यश आले. दुगारवाडी धबधब्यावर रविवारी (दि. ६) पावसाचा जोर वाढल्यामुळे अचानक पाण्याच्या पातळीत वाढ होऊन येथील नदीच्या काठावर अडकलेल्या शहरातील अकरा तरुणांच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला. रेस्क्यूमध्ये स्थानिक ग्रामस्थांना मदत केली.

- Advertisement -

दरम्यान, या धक्कादायक रेस्क्यू ऑपरेशनचा (Rescued Operation) व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.शनिवार आणि रविवारी विकेंड असल्याने एन्जॉय करण्यासाठी शहर परिसरातील अकरा तरुणांचा गट रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे गेला. हा गट धबधब्यावर पोहोचला. पण तेथून त्यांनी अतिउत्साह दाखवून पलिकडील नदीकाठ गाठला. दरम्यान, पावसाचा एन्जॉय घेतानाच पावसाने जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली.

YouTube video player

सकाळपासून पावसाची निरंतर संततधार सुरू असल्याने सकाळी ११ वाजेच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यामुळे डोंगरमाथ्यावरुन कोसळणाऱ्या पाण्यामुळे (Water) धबधब्यासह बाजूच्या नदीतील पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे पूरसदृशस्थिती निर्माण झाली. यावेळी नदीच्या दुसऱ्या काठावर असलेले अकरा तरुण या प्रवाहात अडकून पडले. त्यांनी मदतीसाठी हाक दिली. त्यावेळी येथे तैनात वनरक्षक कैलास महाले यांनी गांभीर्य लक्षात घेत आसपासच्या ग्रामस्थांना रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाचारण केले. यावेळी वन विभागाचे कर्मचारी, तसेच त्र्यंबक पोलीस स्टेशनचे कर्मचारीदेखील हजर झाले.

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, वनपाल मधुकर चव्हाण, अरुण निंबेकर यांनी दाखल होत तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. यावेळी दोर लावून एकेकाला दुसऱ्या काठावर सुरक्षित स्थळी आणण्यात आले. याच भागात यापूर्वीही काही युवक अडकल्याची व दुर्देवी घटना घडल्याच्या नोंदी आहेत. बऱ्याचदा अतिउत्साही तरुणाईकडून नसते धाडस व फाजिलपणा केले जात असल्याने अनेकांच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे पोलीस, वनविभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनाही तोकड्या पडत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...