नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
नवीन नाशिक (New Nashik) विभागीय कार्यालयातर्फे पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव (Pathardi Phata to Pathardi Village) दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटवण्यात आले. पाथर्डी फाटा नजीकच्या मुख्य रस्त्यावरील चिकन,मासे व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान थाटले होते. यामुळे सदरहू परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती.
यामुळे नागरिकांनी (Citizen) महापालिकेला (NMC) तक्रार केली होती. त्यानंतर आज (बुधवारी) सकाळी अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार व नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी रोड परिसरात कारवाई करण्यात आली. कारवाई वेळी नवीन नाशिक विभाग, पश्चिम विभाग, पंचवटी विभाग, सातपूर विभागाच्या (Satpur Division) कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
दरम्यान, या कारवाईत नवीन नाशिक राष्ट्रीय फेरीवाला धोरण सहाय्यक अधीक्षक राजेंद्र उगले ,अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे,प्रवीण बागुल,उमेश खैरे, सुमेश दिवे, निवृत्ती कापडणे , मेहुल दवे, वाहन चालक सुनील हिरे आदींसह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईत चार मोठी वाहने, एक जेसीबीचा समावेश होता. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.




