Saturday, September 14, 2024
Homeनाशिक...तर कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार; माजी महापौरांचा खुलासा

…तर कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार; माजी महापौरांचा खुलासा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. आता नाशिकच्या गॅरेजमध्ये असलेल्या एका कारमुळे माजी महापौर विनायक पांडे यांच्याकडे असलेल्या कार चालकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. याबाबत माजी महापौर विनायक पांडे यांनी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत केला आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या वाहन चालकाची चौकशी केल्याने त्याला नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने त्यासंदर्भात खुलासा करण्यासाठी शिवसेना (उबाठा) मुख्यालयात माजी महापौर विनायक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. यावेळी महानगर प्रमूख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते उपस्थित होते.

माजी महापौर पांडे यांनी तो केवळ आपला चालक म्हणून कामाला होता. वाहन चालक म्हणून तो उत्तम काम करीत होता. प्रत्यक्षात २०१६ पासून तो माझ्याकडे कामाला नव्हता. माझा त्याचा कोणताही संवाद अथवा संपर्क नसल्याचे स्पष्ट केले. २०१८ सालात प्रभागातील एकाच्या निर्यातीला दिलेल्या बोकडांचे पैसे न आल्याने वसूलीसाठी एकदा फोन केला होता. त्यानंतर कोणताही संपर्क अथवा संबंध आलेला नाही. त्या चालकाचा संबंध केवळ चालकाएवढाच मर्यादित होता. सोशल मिडीयासाठी माझ्या पोस्ट तो बनवून देत असे, तेवढाच संबंध असल्याचा खुलासा माजी महापौर विनायक पांडे यांनी केला.

Live : पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन

या बाबत पोलीस प्रशासनाच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी संवादाच्या सर्व यंत्रणा तपासून पाहण्याचेदेखील विनायक पांडे यांनी सांगितले.

दरम्यान, २०१५ मध्ये ललितच्या सफारी कारचा अपघात झाला होता. ही कार नवीन नाशिकच्या एका गॅरेजमध्ये तेव्हापासून पडून आहे. गॅरेज मालकाकडे चौकशी केल्यानंतर पोलीस एका वाहन चालकापर्यंत पोहोचले. हा वाहन चालक माजी महापौरांसाठी काम करत असल्याचे यावेळी समोर आल्याने खळबळ उडाली होती. माजी महापौर विनायक पांडे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत वरील खुलासा केला.

ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत पसरली आहेत. मुंबईच्या पोलीस पथकाने देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथून तीन दिवसांपूर्वी सर्च ऑपरेशन करुन तब्बल १५ किलो ड्रग्ज हस्तगत केले आहे. ललित पाटीलने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चालक सचिन वाघ याच्या मदतीने लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात ड्रग्जच्या १२ किलोच्या आठ बॅगा फेकल्याने त्याचाही शोध मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी सुरु केल्याचे वृत्त आहे.

…तर नाशिकच्या माजी महापौरांची होणार चौकशी

- Advertisment -

ताज्या बातम्या