येवला | प्रतिनिधी | Yeola
कांदा दरातील (Onion Rate) घसरणीने छावा क्रांतिवीर सेना व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmer) येवला बाजार समितीत (Yeola Bazar Samiti) लिलाव बंद पाडून येवला-मनमाड महामर्गवर रास्ता रोको आंदोलन केले. छावा क्रांतिवीर सेना शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख गोरख संत, तालुकाप्रमुख प्रफुल गायकवाड, शहराध्यक्ष विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना निवेदन देण्यात आले.
कांद्याला (Onion) २५ रुपये प्रति किलो अनुदान द्यावे, कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे, शेतीपंपासाठी दिवसा कायमस्वरूपी वीज पुरवठा करावा, नाफेड, एनसीसीएफ माध्यमातून खरेदी भ्रष्टाचारातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, कापसाला किमान १५ हजार रुपये दर द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, कांद्याला ५ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, सोयाबीनला 10,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्यात यावा, आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आंदोलनात (Agitation) छावा क्रांतिवीर सेनेचे संदीप पवार, सोपान लांडगे, गोरख कोटमे, संदीप बर्शीले, गोरख सांभारे, जालिंदर मेटकर, विजय चव्हाण, अण्णासाहेब सोमासे, प्रवीण कदम, प्रिया वर्पे, वैभव भड आदिंसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.