नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या बेमोसमी पावसाने (Rain) बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पावसामुळे द्राक्ष, कांदा पीक (Grape and Onion Crop) संकटात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी दुपारी आणि सायंकाळी नाशिकरोड, बागलाण पिंपळगाव, देवळा, येवला भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी (Farmer) वर्गाची धावपळ उडाली. अनेक ठिकाणी कांदा लागवड सुरू आहे. या पावसामुळे लागवडीत व्यत्यय आला आहे.
दरम्यान, २८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवल्यानंतर काल रात्री अडीचच्या सुमारास नाशकात (Nashik) पावसाने हजेरी लावली. ०.८ मिलीमीटर पाऊस शहरात झाला. मध्यरात्री पाऊस झाल्याने फारसा कोणाला जाणवला नाही. मात्र बत्ती गुल झाली होती. नाशिक जिल्ह्यातील येवला, दिंडोरीसह पूर्व भागामध्ये पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वतावरण आहे. तापमानही वाढले आहे.