Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : कांदा-मका हमी भावासाठी शेतकऱ्यांचे उपोषण; मंत्री भुसेंच्या आश्वासनानंतर घेतला...

Nashik News : कांदा-मका हमी भावासाठी शेतकऱ्यांचे उपोषण; मंत्री भुसेंच्या आश्वासनानंतर घेतला ‘हा’ निर्णय

चांदवड | Chandwad

गेल्या चार दिवसांपासून कांदा आणि मका पिकांना (Onion-Maize Prices) हमीभाव मिळावा या मागणीसाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Chandwad APMC) शेतकऱ्यांचे (Farmer) आमरण उपोषण सुरू होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकऱ्यांनी मुंबई–आग्रा महामार्गावर (Mumbai Aagra Highway) रास्ता रोको करत तीव्र आंदोलन केले.

- Advertisement -

यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.येत्या चार दिवसांच्या आत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी उपोषणकर्त्यांची भेट घालून देण्याची ग्वाही देत त्यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण (Hunger Strike) मागे घेतले. यावेळी खासदार भास्कर आणि खासदार शोभा बच्छाव (MP Bhaskar Bhagare and Shobha Bachhav) उपस्थित होत्या. या उपोषणात डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, विलास अवर, संपतराव वक्ते, विजय जाधव, भिमराव जेजुरे, समाधान जामदार, अनिल ठोके, दशरथ ठाकरे आणि संदीप चव्हाण हे शेतकरी सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले...