Thursday, September 24, 2026
HomeनाशिकNashik News : नांदगांव, चांदवडमध्ये शेतकरी रस्त्यावर; कांदा, मक्याच्या भावासाठी आंदोलन

Nashik News : नांदगांव, चांदवडमध्ये शेतकरी रस्त्यावर; कांदा, मक्याच्या भावासाठी आंदोलन

नांदगाव | चांदवड | प्रतिनिधी

कांदा व मका बाजारभावात सातत्याने होणारी घसरण, कांदा (Onion) निर्यात शुल्क कमी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या (Farmer) होणाऱ्या परवडीच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक झाला असून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कांदा आणि मक्याला अनुदान मिळावे, कांद्यावरील निर्यात शुल्क शुन्य करावे. या मागण्यांसाठी सकाळी नांदगाव येवला रोडवर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

- Advertisement -

चांदवड (Chandwad) येथील कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनीही आजपासून बाजार समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कांदा व मक्याच्या भावात सुरू असलेल्या घसरणीमुळे कांदा व मका उत्पादक सर्वपक्षीय शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत योग्य बाजारभावाच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) यांनी आज उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विनंती केली.

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...